Monday , August 17 2026
Breaking News

लष्करी अधिकाऱ्याचे बंद घर फोडले; ९ लाखांचे दागिने लंपास

Spread the love

 

प्रशिक्षणासाठी मध्य प्रदेशात गेल्याची साधली संधी; लष्करी वसाहतीतील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

बेळगाव : शहरातील सर्वाधिक सुरक्षित मानल्या जाणाऱ्या लष्करी वसाहतीतच चोरट्यांनी धाडसी डाव साधला. प्रशिक्षणासाठी मध्य प्रदेशात गेलेल्या लष्करी अधिकाऱ्याच्या बंद घराचा कडीकोयंडा फोडून ९ लाख १९ हजार रुपयांचे सोने-चांदीचे दागिने लंपास केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. या प्रकारामुळे लष्करी वसाहतीतील सुरक्षेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

गणेशपूर रोडवरील हर्षा एन्क्लेव्ह येथे राहणारे पिनगोंडा विक्रम हे प्रशिक्षणासाठी मध्य प्रदेशात गेले होते. त्यांच्या कुटुंबीयांनीही घराला कुलूप लावून त्यांच्यासोबत मध्य प्रदेश गाठल्याने बंद घरावर चोरट्यांनी पाळत ठेवली. योग्य संधी साधत घरात प्रवेश करून चोरट्यांनी कपाटातील ६३ ग्रॅम सोन्याचे आणि २० ग्रॅम चांदीचे दागिने, असा एकूण ९ लाख १९ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला.

१५ मे ते २ ऑगस्ट या कालावधीत ही चोरी झाल्याचा अंदाज असून, २ ऑगस्ट रोजी घर उघडल्यानंतर चोरीचा प्रकार समोर आला. त्यानंतर बेळगावात परतलेल्या पिनगोंडा विक्रम यांनी कॅम्प पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली.

कॅम्प पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंदवून तपास सुरू केला असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि इतर तांत्रिक पुराव्यांच्या आधारे आरोपींचा शोध घेतला जात आहे. सुरक्षित समजल्या जाणाऱ्या लष्करी वसाहतीतच घरफोडी झाल्याने नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे.

About Belgaum Varta

Check Also

किल्ले प्रतापगडावर सीमाप्रश्नाचा जागर; पुणे विभाग समितीचा पुढाकार

Spread the love  पुणे : महाराष्ट्र एकीकरण समिती पुणे विभागाच्या वतीने विश्वनाथ पाखरे यांच्या नेतृत्वाखाली …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *