Monday , September 21 2026
Breaking News

बेळगाव

कंत्राटदाराच्या कथित छळाला बळी पडला तरुण कामगार

  हिंडाल्कोसमोर ग्रामस्थांचा संताप, प्रशासनाच्या हस्तक्षेपाने तणाव निवळला बेळगाव : बेळगावजवळील हिंडाल्को कंपनीत कार्यरत असलेल्या अवघ्या २४ वर्षीय शंकर तळवार या तरुण कामगाराने कंत्राटदाराच्या कथित छळाला आणि नोकरी टिकवण्यासाठी करण्यात आलेल्या लाचेच्या मागणीला कंटाळून आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. आयुष्याच्या उंबरठ्यावर असलेल्या या तरुणाला पाच लाख रुपयांची मागणी …

Read More »

बेळगावातील मराठी फलक सक्तीने हटवल्याप्रकरणी केंद्राची मोठी दखल; कर्नाटक गृह विभागाला योग्य कारवाईचे निर्देश

  बेळगाव : अनगोळ येथे एका नव्याने सुरू झालेल्या हॉटेलसह बेळगावातील इतर मराठी व्यावसायिक आणि त्यांच्या आस्थापनांवरील मराठी फलकांना कन्नड संघटनांकडून जाणीवपूर्वक लक्ष्य करण्याच्या घटनांची केंद्र सरकारच्या अल्पसंख्यांक मंत्रालयाने गंभीर दखल घेतली आहे. भारत सरकारच्या अल्पसंख्याक कार्य मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या भाषिक अल्पसंख्याक आयुक्तालयाने कर्नाटक राज्याच्या गृह विभागाला या प्रकरणी तातडीने आणि …

Read More »

महाराष्ट्रातून दोन टीएमसी पाणी मिळणे अशक्य

  बेळगाव : महाराष्ट्रातही पाणीटंचाई निर्माण झाल्यामुळे तेथून दोन टीएमसी पाणी मिळणे सध्या तरी शक्य नसल्याची माहिती महाराष्ट्रातील अधिकाऱ्यांनी दिली आहे. अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांनी दिली आहे. महाराष्ट्रातही पाणीटंचाईची समस्या भासत असल्यामुळे अधिकाऱ्यांनी बेळगावला पाणी देण्याबाबत असमर्थता दर्शविली आहे. शिवाय यावर्षीच नव्हे तर यापूर्वीच्या वर्षातही राज्य …

Read More »

आद्रा नक्षत्राने दिला दिलासा; पावसाच्या आगमनाने बळीराजा सुखावला

  बेळगाव : पावसाच्या प्रतीक्षेत डोळे लावून बसलेल्या बळीराजाला अखेर आद्रा नक्षत्राने तारले असून मंगळवारपासून सुरू झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. पावसाच्या आगमनामुळे रखडलेल्या शेतीकामांना आता वेग येण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. यंदा रोहिणी आणि मृग नक्षत्रात अपेक्षित पाऊस न झाल्याने शेतकरी चिंतेत होते. दोन्ही नक्षत्रांनी हुलकावणी …

Read More »

दड्डी सरकारी दवाखान्यात सर्पदंशावरील लस नसल्याने महिलेचा मृत्यू; ग्रामस्थांमध्ये संताप

  हुक्केरी : शट्टिहळ्ळी (ता. हुक्केरी) येथील शेतकरी महिला शांता कृष्णा कळविकट्टे यांचा सर्पदंशामुळे उपचाराअभावी दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली असून, दड्डी प्राथमिक आरोग्य केंद्रात सर्पदंशावरील प्रतिलस (अँटी स्नेक व्हेनम) उपलब्ध नसल्याने हा बळी गेल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून आरोग्य विभागाच्या कार्यपद्धतीवर …

Read More »

शहापूरच्या नाथ पै सर्कलमध्ये भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

  बेळगाव : शहरातील शहापूर येथील नाथ पै सर्कल परिसरात मंगळवारी दुपारी ट्रक आणि दुचाकी यांच्यात झालेल्या भीषण अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर दुचाकीवरील दुसरा प्रवासी गंभीर जखमी झाला. या घटनेनंतर परिसरात मोठी गर्दी झाली असून काही काळ वाहतुकीवरही परिणाम झाला. प्राथमिक माहितीनुसार, भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने दुचाकीला …

Read More »

…ही कोल्हेकुई वेळीच थांबवा; येळ्ळूर म. ए. समितीचा इशारा

  येळ्ळूर : गेली 70 वर्षे लोकशाही मार्गाने महाराष्ट्र एकीकरण समिती आपला लढा प्राणपणाने लढत असताना त्याला गालबोट लावण्याचे लांछनास्पद काम कन्नड संघटना सातत्याने करत आहेत. त्यामुळेच सीमाभागातील वातावरण कलुषित होत आहे. मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने शांततेच्या मार्गाने निवेदन दिल्यानंतर मराठी माणसांना डिवचण्याचे काम करण्यात आले आहे. त्यांना प्रशासन खतपाणी …

Read More »

दि. सह्याद्री मल्टीस्टेट मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या वतीने विद्यार्थ्यांना वह्या वाटप

  बेळगाव : दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित वाघवडे हायस्कूल, वाघवडे शाळेमध्ये मंगळवार दिनांक 23- 06 -2026 रोजी दि. सह्याद्री मल्टीस्टेट मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी, बेळगाव यांच्या वतीने विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष सह्याद्री सोसायटीचे व्हाईस चेअरमन श्री. किरण पाटील होते. कार्यक्रमाची सुरुवात स्वागतगीताने झाली. माननीय प्राचार्य अनंत …

Read More »

‘मराठी भाषा प्रेरणा मंच’तर्फे मराठी विद्यानिकेतनला महात्मा जोतिबा फुले पुरस्कार देऊन सन्मानित

  बेळगाव : सन् 2025-26 मध्ये मराठी विद्यानिकेतन बेळगाव शाळेने सर्व क्षेत्रांमध्ये कौतुकास्पद प्रगती केल्याबद्दल शाळेला मराठी भाषा प्रेरणा मंच बेळगाव यांच्यावतीने “महात्मा जोतिबा फुले पुरस्कार” देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते शाळेचे मुख्याध्यापक नारायण उडकेकर व शिक्षक समन्वयक सविता पवार यांनी हा पुरस्कार स्वीकारला. यावेळी प्रमुख पाहुणे …

Read More »

गर्दीचा फायदा घेऊन दागिने लुटणारी उत्तर प्रदेशातील ११ जणांची टोळी गजाआड

  कागवड : राज्य परिवहन मंडळाच्या बसमध्ये प्रवाशांची गर्दी करून त्यांचे लक्ष विचलित करत सोन्याचे दागिने लुटणाऱ्या उत्तर प्रदेशातील आंतरराज्य टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी ११ जणांना अटक करण्यात आली असून, बेळगावचे पोलीस अधीक्षक के. रामराजन यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.अथणी आणि कागवाड पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रवाशांचे …

Read More »