Monday , September 7 2026
Breaking News

गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची ‘वेदांत’ घेणार जबाबदारी!

Spread the love

 

अभियांत्रिकी, एमबीबीएससाठी आर्थिक मदतीचा हात; शिक्षण पूर्ण होईपर्यंत खर्च उचलणार

बेळगाव : आर्थिक परिस्थितीमुळे गुणवंत विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणाला खीळ बसू नये, यासाठी वेदांत फाउंडेशनने महत्त्वपूर्ण शैक्षणिक उपक्रम हाती घेतला आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल, मात्र शैक्षणिकदृष्ट्या गुणवंत असलेल्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी मिळावी, या उद्देशाने अभियांत्रिकी आणि वैद्यकीय (एमबीबीएस) अभ्यासक्रमातील प्रत्येकी एका विद्यार्थ्याच्या संपूर्ण शैक्षणिक खर्चाची जबाबदारी फाउंडेशन घेणार आहे.

गुणवंत विद्यार्थ्यांना आर्थिक अडचणींमुळे शिक्षणापासून वंचित राहावे लागू नये, यासाठी फाउंडेशनच्या माध्यमातून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खर्च अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत वेदांत फाउंडेशनकडून उचलण्यात येणार आहे.

NEET-CET गुणवत्तेच्या आधारे निवड

या उपक्रमाचा लाभ घेण्यासाठी संबंधित विद्यार्थ्यांनी NEET आणि CET परीक्षांमध्ये उत्तम गुण मिळवून गुणवत्तायादीच्या आधारे अभियांत्रिकी अथवा एमबीबीएस अभ्यासक्रमाला प्रवेश मिळवणे अपेक्षित आहे. गुणवत्तेसोबतच विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थितीही विचारात घेतली जाणार आहे.

गुणवंत असूनही आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम उच्च शिक्षणाची नवी दारे खुली करणारा ठरणार आहे. विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घेऊन आपल्या शैक्षणिक भवितव्याला नवी दिशा द्यावी, असे आवाहन फाउंडेशनतर्फे करण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी वेदांत फाउंडेशनचे अध्यक्ष सतीश पाटील (मो. ९९८०३५८५३७) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

About Belgaum Varta

Check Also

मराठी विद्यानिकेतनमध्ये शिक्षक दिन साजरा

Spread the love  बेळगाव : मराठी विद्यानिकेतनमध्ये शिक्षक दिन साजरा करण्यात आला. शाळेतील इंग्रजी विषयाच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *