Monday , September 7 2026
Breaking News

कुमारिकांकडून देवीला जलार्पण; हजारहून अधिक विद्यार्थिनींना शैक्षणिक साहित्याचे वाटप

Spread the love

 

वडगावात मंगाई देवीच्या यात्रेचा उत्साह शिगेला!

बेळगाव : वडगावची ग्रामदेवता आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री मंगाई देवीच्या वार्षिक यात्रोत्सवातील शेवटचा वार पारंपरिक धार्मिक विधी आणि भक्तिमय वातावरणात उत्साहात पार पडला. अनेक वर्षांपासून अखंड सुरू असलेल्या परंपरेनुसार कुमारिकांनी कलश घेऊन देवीच्या चरणी जल अर्पण करून पूजा केली. यानंतर उपस्थित हजारहून अधिक कुमारिकांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.

श्री मंगाई देवस्थान समिती आणि वडगावातील विविध युवक मंडळांच्या संयुक्त विद्यमाने हा धार्मिक व सामाजिक उपक्रम आयोजित करण्यात आला होता. सकाळपासूनच परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. पारंपरिक वेशभूषेत कलश घेऊन आलेल्या कुमारिकांनी देवीला जलार्पण करून धार्मिक विधींमध्ये सहभाग घेतला.

धार्मिक संस्कारांसोबत शिक्षणाला प्रोत्साहन

मंगाई देवीच्या यात्रेतील ही परंपरा केवळ धार्मिक विधीपुरती मर्यादित न राहता सामाजिक आणि शैक्षणिक संदेश देणारी ठरत आहे. कुमारिकांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करून त्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्याचा उपक्रम अनेक वर्षांपासून राबविला जात आहे. धार्मिक संस्कारांसोबतच मुलींनी शिक्षणाच्या क्षेत्रात पुढे जावे, हा या उपक्रमामागील उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले.

मंगळवारी यात्रेचा मुख्य सोहळा

श्री मंगाई देवी यात्रेचा मुख्य सोहळा मंगळवार दि. ११ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास गाऱ्हाणे उतरवून सुरू होणार आहे. यावेळी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहण्याची शक्यता असून यात्रेची जय्यत तयारी करण्यात आली आहे.

यात्रेत सहभागी होणाऱ्या भाविकांनी शांतता, शिस्त आणि धार्मिक वातावरणाचे भान राखून सहकार्य करावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

सीसीटीव्हीच्या निगराणीत यात्रा

यात्रेच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन आणि महानगरपालिका प्रशासनाने आवश्यक तयारी पूर्ण केली आहे. गर्दीचे नियोजन, वाहतूक व्यवस्था आणि सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना करण्यात आल्या असून संपूर्ण वडगाव परिसरावर सीसीटीव्हीच्या माध्यमातून नजर ठेवण्यात येणार आहे.

भाविकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून यात्रा शांततेत, शिस्तीत आणि उत्साहात पार पाडण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन श्री मंगाई देवस्थान समिती आणि आयोजकांनी केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

मराठी विद्यानिकेतनमध्ये शिक्षक दिन साजरा

Spread the love  बेळगाव : मराठी विद्यानिकेतनमध्ये शिक्षक दिन साजरा करण्यात आला. शाळेतील इंग्रजी विषयाच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *