Monday , September 7 2026
Breaking News

दहशत निर्माण करून फरार झालेल्या रौडीशीटरला अटक; न्यायालयीन कोठडीत रवानगी

Spread the love

 

बेळगाव : सर्वसामान्य नागरिकांना धमकावणे, दहशत निर्माण करणे आणि दबाव टाकून फरार झालेल्या रौडीशीटर शिवानंद कोलकार याला बैलहोंगल पोलिसांनी अटक करून न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवानंद कोलकार याच्याविरुद्ध विविध गुन्हे दाखल असून, शासकीय अधिकाऱ्यांविरुद्ध खोटे जातीय अत्याचाराचे गुन्हे दाखल करण्याची धमकी देणे, दडपशाही करणे तसेच नागरिकांना त्रास देण्याचे आरोप त्याच्यावर आहेत. या पार्श्वभूमीवर त्याची रौडीशीटर म्हणून नोंद करण्यात आली होती.

त्याच्याविरुद्ध न्यायालयाने अटक वॉरंट जारी केले होते. त्यानुसार बैलहोंगल पोलिसांनी विशेष मोहीम राबवून फरार असलेल्या शिवानंद कोलकारला ताब्यात घेतले. त्यानंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असून न्यायालयाने त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.

या कारवाईमुळे फरार गुन्हेगारांविरुद्ध पोलिसांनी कठोर भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले असून, बैलहोंगल पोलिसांच्या या कारवाईचे कौतुक होत आहे.

About Belgaum Varta

Check Also

मराठी विद्यानिकेतनमध्ये शिक्षक दिन साजरा

Spread the love  बेळगाव : मराठी विद्यानिकेतनमध्ये शिक्षक दिन साजरा करण्यात आला. शाळेतील इंग्रजी विषयाच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *