Monday , September 7 2026
Breaking News

१४ ऑगस्ट ‘अखंड हिंदूस्थान संकल्प दिना’च्या पार्श्वभूमीवर रविवारी पूर्वतयारी बैठक

Spread the love

 

बेळगाव : श्रीराम सेना हिंदूस्थानतर्फे १४ ऑगस्ट रोजी साजरा करण्यात येणाऱ्या ‘अखंड हिंदूस्थान संकल्प दिना’च्या पार्श्वभूमीवर पूर्वतयारी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. ही बैठक रविवार, दि. ९ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ७ वाजता पाटील गल्ली येथील सिद्धेश्वर मंदिर कार्यालयात होणार आहे.

या बैठकीत संकल्प दिनानिमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांचे नियोजन, जबाबदाऱ्यांचे वाटप तसेच आयोजनासंदर्भातील विविध बाबींवर चर्चा केली जाणार आहे. कार्यक्रम अधिक प्रभावी आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी कार्यकर्त्यांकडून सूचना व मतेही जाणून घेतली जाणार आहेत.

श्रीराम सेना हिंदूस्थानने सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच देशभक्त युवकांनी वेळेत उपस्थित राहून बैठकीत सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

मराठी विद्यानिकेतनमध्ये शिक्षक दिन साजरा

Spread the love  बेळगाव : मराठी विद्यानिकेतनमध्ये शिक्षक दिन साजरा करण्यात आला. शाळेतील इंग्रजी विषयाच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *