Monday , September 21 2026
Breaking News

बेळगाव

आर. सर्विसेस डेव्हलपर्स बेळगावच्या संचालिका डॉ. सौ. राजश्री राजू तुडयेकर यांच्याकडून सावगाव शाळेला संगणक भेट

  बेळगाव : आर. सर्व्हिसेस डेव्हलपर्स बेळगावच्या संचालिका डॉ. राजश्री राजू तुडयेकर यांच्याकडून सावगाव येथील सरकारी पूर्ण प्राथमिक मराठी शाळेला संगणक संच देणगी दाखल देण्याचा कार्यक्रम नुकताच उत्साहात पार पडला. सरकारी पूर्ण प्राथमिक मराठी शाळा, सावगाव येथे सागर सावगावकर यांच्या अध्यक्षतेखाली काल गुरुवारी आयोजित या कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या म्हणून देणगीदार …

Read More »

मुख्यमंत्री निवासस्थानासमोरील धरणे आंदोलन तूर्तास स्थगित; ३० जून रोजी सीमाप्रश्नी उच्चाधिकार समितीची बैठक

  सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीबाबतही चर्चा बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समितीच्या मध्यवर्ती समितीची तातडीची बैठक पार पडली. या बैठकीत येत्या २९ जून रोजी मुंबई येथे मुख्यमंत्री निवासस्थानासमोर आयोजित करण्यात आलेल्या धरणे आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या सीमाप्रश्नाच्या सुनावणीसंदर्भातही विचारविनिमय झाला. बैठकीनंतर माहिती देताना मध्यवर्ती महाराष्ट्र …

Read More »

बेळगाव शहरात जप्त अंमली पदार्थांचा वैज्ञानिक पद्धतीने नाश

  बेळगाव : बेळगाव शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत एनडीपीएस (NDPS) कायद्यांतर्गत विविध गुन्ह्यांमध्ये जप्त करण्यात आलेल्या सुमारे ५७.७८ लाख रुपयांच्या अंमली पदार्थांचा गुरुवारी (२५ जून) वैज्ञानिक व नियमानुसार नाश करण्यात आला. पोलीस आयुक्तालयाच्या विविध पोलीस ठाण्यांमध्ये अंमली पदार्थांची तस्करी व विक्री करणाऱ्यांविरोधात दाखल झालेल्या २४ प्रकरणांतील जप्त मालाचा यात समावेश …

Read More »

अष्टपैलू व्यक्तिमत्त्व, आमचा आधारस्तंभ पप्पा; स्वर्गीय श्रीधर महागावकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली

  आमचे पप्पा, स्वर्गीय श्रीधर महागावकर, हे केवळ आमच्या कुटुंबाचे प्रमुख नव्हते, तर आमच्या आयुष्याचा भक्कम आधारस्तंभ होते. अत्यंत कष्टाळू, प्रामाणिक, जिद्दी आणि कुटुंबवत्सल व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची ओळख होती. त्यांनी आयुष्यभर स्वतःपेक्षा कुटुंबाला अधिक महत्त्व दिले आणि आपल्या कष्टाच्या बळावर कुटुंबासाठी सन्मानाने जगण्याचा मार्ग उभा केला. अत्यंत साध्या परिस्थितीतून त्यांनी …

Read More »

रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पणचा पदग्रहण समारंभ

  बेळगाव: रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पण (आर.आय. जिल्हा ३१७०) तर्फे रोटरी वर्ष २०२६-२७ साठीचा पदग्रहण समारंभ शनिवार, २७ जून २०२६ रोजी सायंकाळी ५:३० वाजता ‘पाय कन्व्हेन्शन हॉल’, उद्यमबाग (नागशांतीच्या मागे), बेळगाव येथे आयोजित करण्यात आला आहे. या समारंभात रोटरियन डॉ. स्फूर्ती मस्तिहोळी या २०२६-२७ या वर्षासाठी क्लबच्या अध्यक्षपदाची सूत्रे …

Read More »

बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या शालेय निबंध स्पर्धां 2025 चा यशस्वी विद्यार्थ्याचा बक्षिसे वितरण सोहळा संपन्न

  बेळगाव : बृहन्महाराष्ट्र मंडळ (नवी दिल्ली), राज्य मराठी विकास संस्था, मुंबई तसेचं सलग्न संस्था मराठी भाषा प्रेमी मंडळ, बेळगाव यांच्या सहयोगाने मराठी भाषा निबंध स्पर्धा 2025-26 शाळावार दहा शाळांचे यश संपादन केलेल्या प्रत्येकी तीन विद्यार्थी व मराठी विषय शिक्षक, तसेच मुख्याध्यापक यांचा आजच्या योग-दिनाचे औचित्य साधून रोख रक्कम व …

Read More »

अबकारी आयुक्तांच्या निवासस्थानी १३.३ कोटींची मालमत्ता ईडीकडून जप्त

  बेळगाव : बेळगाव अबकारी विभागाचे अतिरिक्त आयुक्त वाय. मंजुनाथ यांच्या निवासस्थानी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) केलेल्या छापेमारीत तब्बल १३.३ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या कारवाईमुळे राज्यातील प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, छाप्यात ५.५ कोटी रुपये रोख रक्कम, ७.८ कोटी …

Read More »

येळ्ळूरमध्ये लम्पी रोगामुळे बैलाचा मृत्यू; शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान

  बेळगाव : बेळगाव तालुक्यातील येळ्ळूर गावातील शेतकरी मारुती मोन्नप्पा मजुकर यांच्या बैलाचा लम्पी रोगामुळे दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लम्पी रोगाची लागण झाल्यानंतर संबंधित बैलाची प्रकृती खालावली होती. पशुवैद्यकीय उपचार सुरू असतानाही …

Read More »

मध्यवर्ती म. ए. समितीची उद्या महत्वपूर्ण बैठक

  बेळगाव : 29 जून रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात येणार असल्यासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यासाठी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सर्व सभासदांची बैठक शुक्रवार दिनांक 26 जून 2026 रोजी दुपारी 3=00 वाजता मराठा मंदिर खानापूर रोड बेळगाव येथे बोलवण्यात आली आहे. या …

Read More »

विना भीती आव्हानांना सामोरे जा; दिव्यांगांनी आत्मविश्वासाने जीवन घडवावे : आमदार आसिफ सेठ

  बेळगाव : दिव्यांग व्यक्तींमध्ये विशेष शक्ती असते. त्यामुळे कोणत्याही कारणाने घाबरून न जाता आत्मविश्वासाने आव्हानांना सामोरे जात स्वतःचे जीवन घडवावे, असे आवाहन आमदार आसिफ सेठ यांनी केले. बेळगाव महानगरपालिकेच्या आवारात गुरुवारी आयोजित कार्यक्रमात महापालिकेच्या दारिद्र्य निर्मूलन कक्षामार्फत ५ टक्के अनुदान योजनेअंतर्गत २६ पात्र दिव्यांग लाभार्थ्यांना इलेक्ट्रिक मोपेड तीनचाकी वाहनांचे …

Read More »