Monday , August 17 2026
Breaking News

डी. वाय. चौगुले भरतेश हायस्कूलमध्ये बालक- पालक- शिक्षक मेळावा संपन्न

Spread the love

 

बेळगाव : भरतेश शिक्षण संस्था संचलित डी. वाय. चौगुले भरतेश हायस्कूल येथे बालक -पालक-शिक्षक मेळावा आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी डी. वाय. चौगुले भरतेश हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक तसेच शाळा सुधारणा समितीचे सदस्य श्री. बी. एल. सायनेकर सर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून असे म्हटले की, “पालकांचा सन्मान करा, त्यांच्या कष्टांची जाणीव ठेवा आणि आपल्या कर्तृत्वाने त्यांचे नाव उज्ज्वल करा.” तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासामध्ये बालक- पालक -शिक्षक यांची अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका आहे आणि ही भूमिका त्यांनी बजावून सांगण्यासाठी आपल्या जीवनात शिस्तीचा, आरोग्याचा त्याचप्रमाणे मित्रपरिवार कसा असला पाहिजे, सोशल मीडियापासून मुलांना कशाप्रकारे लांब ठेवलं पाहिजे त्याचप्रमाणे येणाऱ्या काळातील आव्हानांना आपल्या मुलांना कशाप्रकारे आपण तयार केलं पाहिजे या सगळ्याबद्दल अतिशय उत्तमरीत्या असं मार्गदर्शन सरांनी मार्गदर्शन केले.
सर्वप्रथम चेतन चौगुले यांनी आपल्या भक्ती गीताने या कार्यक्रमाची सुरुवात केली त्यानंतर आजच्या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी माजी मुख्याध्यापक श्री. बी. एल. सायनेकर सर यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. त्यानंतर शाळेचे मुख्याध्यापक श्री. एम. बी. चौगुले सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले तसेच त्यांचेही पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. अशाच प्रकारे शाळेचे इन्चार्ज हेडमास्टर श्री. एम. बी. बखेडी यांचेही पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी लावण्या चौगुले हिने केले तर स्वागत भाषण स्वराली लगाडे हिने केले तर आभार प्रदर्शन कुमारी कल्याणी जाधव हिने यांनी केले. या कार्यक्रमाला पालक वर्ग बहुसंख्येने उपस्थित होते तसेच इतर शिक्षक वर्ग सुद्धा उपस्थित होते. तसेच यावेळी एफ ए वन निकाल सुद्धा पालकांना दाखविण्यात आला अशा प्रकारे आजचा पालक मेळावा संपन्न झाला.

About Belgaum Varta

Check Also

मंगळागौरीच्या पारंपरिक खेळांनी रंगला ‘सखी’चा सांस्कृतिक सोहळा

Spread the love  बेळगाव : महाराष्ट्राच्या समृद्ध लोकपरंपरेचा सुगंध, मंगळागौरीच्या खेळांचा उत्साह आणि महिलांच्या कलागुणांची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *