Monday , August 17 2026
Breaking News

येळ्ळूर रोप-वे प्रकल्पाला लवकर मंजुरी द्या : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे आमदार अभय पाटील यांची मागणी

Spread the love

 

बेळगाव : येळ्ळूर येथील प्रस्तावित रोप-वे (केबल कार) प्रकल्पाला लवकर मंजुरी देऊन त्याच्या कार्यवाहीला गती द्यावी, अशी मागणी बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली.

आमदार पाटील यांनी नवी दिल्ली येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन येळ्ळूर रोप-वे प्रकल्पाबाबत चर्चा केली. हा प्रकल्प काही काळापासून मंजुरीच्या प्रतीक्षेत असून, त्याला केंद्र सरकारकडून लवकर मान्यता मिळावी, अशी विनंती त्यांनी केली.

येळ्ळूर परिसराला पर्यटनाच्या दृष्टीने मोठी क्षमता असून, रोप-वे प्रकल्प साकारल्यास परिसरातील पर्यटकांची संख्या वाढण्यास मदत होईल. त्यातून स्थानिक पातळीवर नवीन व्यवसायाच्या संधी, रोजगारनिर्मिती आणि आर्थिक विकासाला चालना मिळेल, असे पाटील यांनी गडकरी यांच्या निदर्शनास आणून दिले.

सीमाभागातील या परिसराचे पर्यटनदृष्ट्या विशेष महत्त्व असून, प्रकल्पामुळे बेळगावच्या पर्यटन क्षेत्राला नवी दिशा मिळू शकते. या प्रकल्पाचा विषय यापूर्वीही केंद्र सरकारकडे वारंवार मांडण्यात आला असून, आता पुन्हा एकदा त्याला गती देण्याची मागणी करण्यात आल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले.

यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत प्रकल्प पुढे नेण्यासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

About Belgaum Varta

Check Also

मंगळागौरीच्या पारंपरिक खेळांनी रंगला ‘सखी’चा सांस्कृतिक सोहळा

Spread the love  बेळगाव : महाराष्ट्राच्या समृद्ध लोकपरंपरेचा सुगंध, मंगळागौरीच्या खेळांचा उत्साह आणि महिलांच्या कलागुणांची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *