
बेळगाव : वडगाव येथील सरकारी उच्च प्राथमिक मराठी मुलींची शाळा क्रमांक ५ येथे मंगळवार, दि. ४ ऑगस्ट २०२६ रोजी नूतन शाळा अभिवृद्धी व व्यवस्थापन समितीची (SDMC) निवड करण्यात आली. अध्यक्षपदी सौ. दूर्वा हरीश देसाई यांची बिनविरोध, तर उपाध्यक्षपदी श्री. आनंद ज्योतिबा कुर्ले यांची एका मताने निवड झाली.
समितीच्या सदस्यपदी सौ. नूतन निकेश बामणे, सौ. प्रियंका परशुराम देसुरकर, सौ. प्रिया शक्ती काकतकर, सौ. रिता जीऊतकुमार पासवान, सौ. शितल आनंद पाटील, सौ. विणा विठ्ठल कंग्राळकर, सौ. वैभवी विनायक कोनेरी, सौ. राधिका देवी प्रजापती, श्री. विष्णू प्रकाश कडोलकर, श्री. देवेंद्र मनोहर शिंदे, श्री. महेश यल्लाप्पा तारिहाळकर, श्री. मंगेश बंडू यलजी, श्री. विजय आनंद कंग्राळकर, श्री. गणेश दत्तात्रय चौधरी, श्री. उत्तम दुधाप्पा तारीहाळकर आणि श्री. जमिल सिकंदर शेख यांची निवड झाली.
पदनिमित्त सदस्य म्हणून सौ. दीपा मकरंद देसाई, सौ. लक्ष्मी प्रदीप धनाई आणि अंगणवाडी कार्यकर्त्या सौ. प्रभावती काकडे यांची निवड करण्यात आली. नामनिर्देशित सदस्य म्हणून नगरसेविका सौ. दिपाली टोपगी, शिक्षक प्रतिनिधी म्हणून सौ. विजया गणपती रसाळ, तर विद्यार्थिनी प्रतिनिधी म्हणून कु. स्वरा उत्तम पाटील यांची निवड झाली. समितीचे कार्यदर्शी म्हणून शाळेचे मुख्याध्यापक श्री. के. एम. बेलगामी पदभार सांभाळणार आहेत.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगरसेविका सौ. दिपाली टोपगी होत्या. सीआरपी श्री. इमाम सनदी यांनी SDMCच्या कार्य व जबाबदाऱ्यांची माहिती दिली. मुख्याध्यापक श्री. के. एम. बेलगामी यांनी समिती रचनेची नियमावली तसेच शाळेच्या विकासामध्ये समितीची भूमिका व कर्तव्ये याबाबत मार्गदर्शन केले.
यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष श्री. उत्तम नारायण पाटील उपस्थित होते. नूतन समितीच्या सदस्यांचा गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला पालकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. शाळेचे शिक्षक श्री. नितीन यल्लाप्पा बेनके, सौ. कीर्तीमालिनी कुष्टे आणि सौ. सरिता पाटील उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका सौ. वैशाली पाटील यांनी केले, तर सौ. दीपा देसूरकर यांनी आभार मानले.
Belgaum Varta Belgaum Varta