Monday , August 17 2026
Breaking News

जलतरण प्रशिक्षक शिवराज मोहिते यांना भावपूर्ण श्रद्धांजली

Spread the love

 

बेळगाव : जलतरण प्रशिक्षक शिवराज मोहिते यांच्या दुःखद आणि अकाली निधनाबद्दल आबा स्पोर्ट्स क्लबतर्फे बुधवारी, ५ ऑगस्ट रोजी महानगरपालिकेच्या जलतरण तलावात शोकसभेचे आयोजन करण्यात आले. यावेळी जलतरण क्षेत्रातील खेळाडू, प्रशिक्षक, पालक, क्रीडाप्रेमी तसेच विविध क्रीडा संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शोकसभेच्या प्रारंभी शिवराज मोहिते यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. उपस्थितांनी दोन मिनिटे स्तब्ध राहून त्यांच्या स्मृतीस भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. त्यांच्या अकाली निधनामुळे जलतरण क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

यावेळी जलतरण प्रशिक्षक विश्वास पवार यांनी शिवराज मोहिते यांच्या निधनाने जलतरण क्रीडा क्षेत्राची मोठी हानी झाल्याचे सांगितले. मोहिते यांनी जलतरणपटूंना प्रशिक्षण देताना क्रीडा क्षेत्रासाठी दिलेले योगदान कायम स्मरणात राहील, असे त्यांनी नमूद केले.

शोकसभेला आबा स्पोर्ट्स क्लब, डॉल्फिन क्लब, क्रीडा भारती, स्केटिंग क्लब यांचे पदाधिकारी, जलतरणपटू, त्यांचे पालक, प्रशिक्षक आणि क्रीडाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी आबा स्पोर्ट्स क्लबचे अध्यक्ष शितल हुलभते, स्केटिंग प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर, सामाजिक कार्यकर्ते पद्मप्रसाद हुली, गणेश दड्डीकर, आर्टिस्ट वसंत निर्मले, भक्ती शिंदे आणि डॉ. शिवप्रसाद दंडगी यांनी शिवराज मोहिते यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. शोकसभेच्या निमित्ताने उपस्थितांनी त्यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांच्या क्रीडा क्षेत्रातील योगदानाचे स्मरण केले.

About Belgaum Varta

Check Also

श्रावणाच्या पहिल्या सोमवारी कपिलेश्वर मंदिरात धार्मिक कार्यक्रमांची मांदियाळी

Spread the love    बेळगाव : भगवान शिवशंकराच्या आराधनेत मन रमविणारा, भक्ती आणि अध्यात्माची अनुभूती …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *