Monday , August 17 2026
Breaking News

‘चला खेळूया मंगळागौर 2026’चा रंगतदार महोत्सव 8 व 9 ऑगस्टला

Spread the love

 

सखी ग्रुपचा महिलांच्या कला, संस्कृती आणि उद्योजकतेला नवा मंच; विविध स्पर्धा, स्टॉल्स आणि सांस्कृतिक मेजवानीची पर्वणी

बेळगाव : महिलांमधील पारंपरिक संस्कृती, लोककला आणि उद्योजकतेला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने सखी ग्रुप, बेळगाव यांच्या वतीने ‘चला खेळूया मंगळागौर 2026’ या दोन दिवसीय भव्य सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार, 8 ऑगस्ट व रविवार, 9 ऑगस्ट रोजी शास्त्रीनगर येथील गुजरात भवन येथे हा महोत्सव उत्साहात पार पडणार आहे.

महोत्सवाचे उद्घाटन शनिवारी, 8 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता महिला भाजप नेत्या डॉ. सोनाली सरनोबत यांच्या हस्ते होणार आहे. सखी ग्रुपच्या संस्थापिका व अध्यक्षा रश्मी कोरडे, संस्थापिका उपाध्यक्षा एकता गोंदकर तसेच सखीच्या सदस्यांच्या नेतृत्वाखाली हा सोहळा संपन्न होणार आहे.

या महोत्सवाचे प्रमुख आकर्षण ठरणार आहे ‘मंगळागौर क्वीन 2026’ स्पर्धा. याशिवाय मंगळागौर थीमवरील समूह नृत्य स्पर्धा, मुलींसाठी पारंपरिक समूह नृत्य स्पर्धा, पाककला स्पर्धा, लहान मुलांसाठी वारकरी थीम फॅन्सी ड्रेस स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, रंगभरण स्पर्धा तसेच ‘सखी एक्स्पो’ यांचे आयोजन करण्यात आले आहे.

महिला उद्योजिकांसाठी विविध व्यावसायिक स्टॉल्सची विशेष व्यवस्था करण्यात आली असून स्थानिक उद्योजकांना आपल्या उत्पादनांचे प्रदर्शन व विक्री करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध होणार आहे.

हा महोत्सव म्हणजे सांस्कृतिक परंपरा, मनोरंजन, खरेदी आणि खाद्यसंस्कृतीचा अनोखा संगम ठरणार आहे. विविध खेळ, आकर्षक स्पर्धा, रंगतदार सांस्कृतिक कार्यक्रम, वैविध्यपूर्ण खाद्यपदार्थ आणि खरेदीची पर्वणी यामुळे हा उत्सव सर्वांसाठी खास ठरणार आहे.

‘सखीने… सखींसाठी… सखींकडून…’ या संकल्पनेतून साकारलेल्या या उपक्रमात बेळगाव व परिसरातील महिला, युवती आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, तसेच विविध स्टॉल्स, सांस्कृतिक कार्यक्रम आणि खाद्य महोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

मंगळागौरीच्या पारंपरिक खेळांनी रंगला ‘सखी’चा सांस्कृतिक सोहळा

Spread the love  बेळगाव : महाराष्ट्राच्या समृद्ध लोकपरंपरेचा सुगंध, मंगळागौरीच्या खेळांचा उत्साह आणि महिलांच्या कलागुणांची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *