Monday , September 21 2026
Breaking News

बेळगाव

राकसकोप-हिडकल जलाशयातील पाणीसाठा तळाला; बेळगाववर भीषण पाणीसंकटाचे गडद सावट

  बेळगाव : “पाणी जपून वापरा…” हा सल्ला आता केवळ प्रशासनाचे आवाहन राहिलेला नाही, तर येणाऱ्या भीषण पाणीसंकटाचा इशारा ठरत आहे. शहराला जीवनदायी ठरणाऱ्या राकसकोप-हिडकल जलाशयातील पाणीसाठा झपाट्याने घटत असल्याने बेळगावकरांना आगामी काळात तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याची चिन्हे स्पष्ट दिसू लागली आहेत. या पार्श्वभूमीवर महापालिकेने नागरिकांना पाण्याचा प्रत्येक थेंब …

Read More »

नीट परीक्षेच्या पार्श्वभूमीवर 28 केंद्रांभोवती जमावबंदी; नियमभंग करणाऱ्यांवर कडक कारवाईचा इशारा

  बेळगाव : वैद्यकीय प्रवेशासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी नीट (NEET) परीक्षा रविवार, 21 जून रोजी शहर व उपनगरातील 28 परीक्षा केंद्रांवर होणार आहे. परीक्षेच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी तथा पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांनी परीक्षा केंद्रांच्या परिसरात जमावबंदी लागू करण्याचे आदेश जारी केले आहेत. नीट …

Read More »

चिकोडीतील गुरुवार पेठेत भीषण आग; जयश्री गारमेंट्ससह शेजारील घरांचे मोठे नुकसान

  चिकोडी : शहरातील गुरुवार पेठ परिसरात संशयित शॉर्टसर्किटमुळे भीषण आग लागून जयश्री गारमेंट्स हे दुकान पूर्णपणे जळून खाक झाले. या आगीने काही क्षणांतच उग्र रूप धारण करत दुकानामागील अनेक निवासी घरांनाही विळखा घातल्याने मोठ्या प्रमाणात मालमत्ता व घरगुती साहित्याचे नुकसान झाले. मिळालेल्या माहितीनुसार, आगीची सुरुवात जयश्री गारमेंट्समध्ये झाल्याचा प्राथमिक …

Read More »

२६व्या राष्ट्रीय पॅरा जलतरण स्पर्धेत स्विमर्स क्लब बेळगावचा जलवा; ३६ पदकांची कमाई

  बेळगाव : बंगळुरू येथील झी स्विम अकॅडमी, व्हाईटफिल्ड येथे ८ ते १० जून दरम्यान झालेल्या २६व्या राष्ट्रीय पॅरा जलतरण स्पर्धा २०२६ मध्ये स्विमर्स क्लब बेळगावच्या जलतरणपटूंनी दमदार कामगिरी करत बेळगावचे नाव राष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल केले. क्लबच्या १४ पॅरा जलतरणपटूंनी एकूण ३६ पदकांची कमाई केली असून त्यामध्ये १० सुवर्ण, २३ …

Read More »

कन्नड फलक सक्तीविरोधातील मोर्चासाठी जनजागृतीला वेग; मराठी अस्मितेसाठी मोठ्या संख्येने सहभागी व्हा : प्रकाश मरगाळे

  बेळगाव : मराठी भाषा आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी प्रत्येक मराठी भाषकाने पुढे येणे आवश्यक असून, कन्नड फलक सक्तीविरोधातील लढा हा अस्मितेचा प्रश्न आहे. त्यामुळे आगामी भव्य मोर्चात प्रचंड संख्येने सहभागी होऊन लोकशाही मार्गाने आपली भूमिका ठामपणे मांडावी, असे आवाहन मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष प्रकाश मरगाळे यांनी केले. कन्नड फलक …

Read More »

स्वप्न पहा आणि ती स्वप्ने प्रत्यक्षात उतरवण्यासाठी सचोटीने जिद्दीने वाटचाल करा : लीना भोमाज

  बेळगाव : “स्वप्न पहा आणि ती स्वप्ने प्रत्यक्षात उतरवण्यासाठी सचोटीने जिद्दीने वाटचाल करा, असा संदेश हजारो विद्यार्थ्यांना देऊन गेलेल्या प्रभाताई यांचे नाव आज या शाळेला दिले जात आहे हा अतिशय चांगला योग आहे’ असे विचार डॉ.लीना भोमाज यांनी बोलताना व्यक्त केले. महिला विद्या मंडळाच्या एम व्ही एम इंग्लिश मीडियम …

Read More »

चलो कोल्हापूर; म. ए. समितीच्या कार्यकर्त्यांना जाहीर आवाहन…

  बेळगाव : भारताचे माननीय गृहमंत्र श्री.. अमितजी शाह हे शनिवार दिनांक 20 जून रोजी कोल्हापूरच्या दौऱ्यावर येणार आहेत. कोल्हापूर येथे त्यांची भेट घेऊन त्यांना महाराष्ट्र- कर्नाटक सीमाप्रश्नी निवेदन देण्याचा निर्णय मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समिती बैठकीत घेण्यात आला आहे. त्यानुसार सर्व कार्यकर्त्यांनी शनिवार दिनांक 20 जून 2026 रोजी सकाळी साडेनऊच्या …

Read More »

कर्नाटक – महाराष्ट्र मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत बेळगावच्या पाणी संकटावर निर्णायक चर्चा; महाराष्ट्राकडे दोन टीएमसी पाण्याची मागणी

  बेळगाव : पावसाने दडी मारल्यामुळे भीषण पाणीटंचाईच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या बेळगाव शहरासाठी दिलासादायक घडामोड घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात 20 जून रोजी होणाऱ्या महत्त्वपूर्ण बैठकीत बेळगावच्या पाणीप्रश्नावर विशेष चर्चा होणार असून, महाराष्ट्राकडून दोन टीएमसी पाणी उपलब्ध करून देण्याचा …

Read More »

महामोर्चाची जनजागृती उद्या “या” भागात करण्यात येणार!

  बेळगाव : मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने दिनांक २२ जून रोजी बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. मराठी भाषा, मराठी अस्मिता आणि सीमाभागातील मराठी जनतेच्या हक्कांसाठी निघणाऱ्या या मोर्चाची जनजागृती करण्यासाठी शुक्रवार दिनांक 19 जून रोजी सायंकाळी 6 वाजता अनगोळ, मजगाव, पिरनवाडी, मच्छे भागात जनजागृती फेरी …

Read More »

कुत्र्याचा जीव वाचवताना आईचा दुर्दैवी अंत; मुलासमोरच घडली हृदयद्रावक घटना

  बेळगाव : रस्ता ओलांडणाऱ्या एका भटक्या कुत्र्याचा जीव वाचवण्याच्या प्रयत्नात एका आईला स्वतःचा जीव गमवावा लागल्याची अत्यंत दुर्दैवी घटना गुरुवारी सांबरा गावाजवळ घडली. मुलासोबत दुचाकीवर प्रवास करत असताना अचानक झालेल्या या अपघाताने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. माहितीनुसार, पंत बाळेकुंद्री येथील महंतेश कलमठ हे आपल्या आई शांताव्वा कलमठ यांना …

Read More »