Monday , August 17 2026
Breaking News

ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे बोरगाव सर्कल रुंदीकरण कामाला विलंब; माजी जिल्हा पंचायत सदस्य राजेंद्र पवार -वडर यांचा आरोप

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : बोरगाव सर्कल रुंदीकरण व्हावे यासाठी राज्य सरकारकडून २ कोटी ५० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. २४ जानेवारी २०२६ ला लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत कामाचे उद्घाटन करण्यात आले. पण ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे बोरगाव सर्कल रुंदीकरण कामास विलंब होत असल्याचा आरोप माजी जिल्हा पंचायत सदस्य राजेंद्र पवार -वडर यांनी केला.

बोरगाव सर्कल हा परिसरातील महत्त्वाचा आणि वर्दळीचा मार्ग आहे. या ठिकाणी वाहतुकीची वाढती वर्दळ लक्षात घेऊन रस्ता रुंदीकरणाचे काम हाती घेण्यात आले. मात्र काम गतीने होत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. अपूर्ण कामामुळे वाहनचालकांसह स्थानिक नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. ठेकेदाराकडून वेळेत काम होत नसल्यास दुसऱ्या ठेकेदाराला हे काम सोपवावे व लवकरात लवकर रुंदीकरण काम पूर्ण करावे. ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
रुंदीकरणासाठी काही ठिकाणी करण्यात आलेल्या कामामुळे वाहतुकीला अडथळे निर्माण होत असून काम दीर्घकाळ रखडल्यास नागरिकांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे. संबंधित विभागाने ठेकेदाराला स्पष्ट सूचना देऊन आवश्यक मनुष्यबळ व यंत्रसामग्रीच्या सहाय्याने कामाला गती द्यावी, अशी मागणी पवार यांनी केली.
या कामासंदर्भात आपण लवकरच पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांची भेट देऊन सविस्तर चर्चा करणार आहोत. तसेच संबंधित अधिकाऱ्यांनीही याबाबत कळवून तात्काळ काम पूर्ण करावे अशी मागणी करणार असल्याचे पवार यांनी सांगितले.
——————————————————————–
नागरिकांच्या गैरसोयीला जबाबदार कोण?
एकीकडे वाहतुकीची समस्या सोडविण्यासाठी रुंदीकरणाचे काम हाती घेण्यात आले असताना दुसरीकडे त्याच कामाच्या विलंबामुळे नागरिकांना गैरसोय होत असल्याने स्थानिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे. प्रशासनाने आता केवळ सूचना न देता प्रत्यक्ष कामाला गती मिळेल यासाठी ठोस पावले उचलावीत आणि बोरगाव सर्कलचे रुंदीकरण लवकरात लवकर पूर्ण करून वाहतूक सुरळीत करावी, अशी मागणी राजेंद्र पवार- वडर यांनी केली आहे.

About Belgaum Varta

Check Also

बेळगावच्या राजाचे ‘श्री गणेश खांब मुहूर्तमेढ पूजन’ उत्साहात संपन्न

Spread the love  बेळगाव : सीमाभागातील लाखो गणेशभक्तांचे श्रद्धास्थान आणि नवसाला पावणारा बाप्पा अशी ख्याती …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *