Monday , August 17 2026
Breaking News

मंत्री संतोष लाड यांची कर्नाटक राज्याच्या कॅबिनेट मंत्रीपदी निवडी निमित्त निपाणीत आनंदोत्सव

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : मंत्री संतोष लाड यांची कर्नाटक राज्याच्या कॅबिनेट मंत्रीपदी निवडी निमित्त निपाणीतील श्री मराठा सौहार्द बँक आणि मराठा समाजातर्फे आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी फटाक्यांची आतषबाजी व मिठाई वाटप करून आनंद व्यक्त करण्यात आला.
प्रा. बाळासाहेब सूर्यवंशी यांनी, गेल्या महिन्यात श्री मराठा सौहार्द बँकेत झालेल्या बैठकीत संतोष लाड त्यांना कॅबिनेट मंत्रीपद देण्याची मागणी करण्यात आली होती ती मागणी पूर्ण झाल्याचा आनंद सर्व कार्यकर्त्यांना आहे. शिवाय संतोष लाड यांना पुढील यशस्वी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी प्रा.बाळासाहेब सूर्यवंशी, टाऊन प्लॅनिंग अध्यक्ष, निकु पाटील, राजेश कदम, युवा नेते सुजय पाटील, माजी नगराध्यक्ष चंद्रकांत जासूद, बाळासाहेब देसाई- सरकार, राजेंद्र चव्हाण, मराठा बँकेचे अध्यक्ष प्रशांत नाईक, माजी नगरसेवक अरुण आवळेकर, माजी सभापती किरण कोकरे, माजी नगरसेवक संदीप चावरेकर, उदय शिंदे, प्रा. भारत पाटील, प्रा. शिवाजी मोरे, डॉ. विनय निर्मळे यांच्यासह मराठा समाजातील प्रतिष्ठित मंडळी तसेच आजी-माजी लोकप्रतिनिधी व संस्थेचे संचालक मंडळ उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

अरिहंत सौहार्द संस्थेला १८.३२ कोटीचा नफा; अध्यक्ष अभिनंदन पाटील

Spread the love  बोरगाव अरिहंतची ३६ वी वार्षिक सभा निपाणी (वार्ता) : सर्वसामान्य नागरिक आणि …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *