Monday , August 17 2026
Breaking News

यापुढेही समरसेन पाटील यांनी सामाजिक कार्याला वाहून घ्यावे; प्रा. विक्रम पाटील

Spread the love

 

बेळगाव : शिक्षक वेगळा आणि कार्यकर्ता वेगळा असतो. सुरुवातीला समरसेन पाटील यांनी लोकांना बरोबर घेऊन महत्त्वाचे शैक्षणिक कार्य केले. त्यांनी स्वतःचे घर सांभाळत, शाळा सांभाळत, सामाजिक कार्य‌ केले. निवृत्तीनंतरही त्यांनी सामाजिक कार्याला वाहून घ्यावे, असे प्रतिपादन दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाचे सचिव प्रा. विक्रम पाटील यांनी केले.
मच्छे (तालुका बेळगाव) येथील दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचालित व्ही.एस. पाटील हायस्कूलचे मुख्याध्यापक एस. डी. पाटील, हे आपल्या शिक्षकी पेशातून सेवानिवृत्त झाले. त्यामुळे त्यांचा सदिच्छा समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रा. विक्रम पाटील बोलत होते.
शाळेच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे उपाध्यक्ष अँड.राजाभाऊ पाटील हे होते.
सुरुवातीला शाळेचे शिक्षक पी. एम. पाटील यांनी प्रास्ताविक करून कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट करून सांगितला; तर ज्येष्ठ शिक्षक एस.आर. कम्मार यांनी पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
प्रारंभी संस्थेचे उपाध्यक्ष अँड. राजाभाऊ पाटील, सचिव प्रा.विक्रम पाटील, सहसचिव पी.पी.बेळगावकर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले; तर खजिनदार एन.बी. खांडेकर यांच्या हस्ते महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन; तर मराठा बँकेचे अध्यक्ष बाळाराम पाटील यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुष्पहार घालून पूजन करण्यात आले.
याप्रसंगी बोलताना संस्थेचे सहसचिव पी.पी. बेळगावकर म्हणाले, “समरसेन पाटील यांनी शैक्षणिक क्षेत्रात चांगले कार्य करून आपल्या कार्याचा वेगळा ठसा उमटविला आहे. पाटील यांनी गेली तीन तपे प्रामाणिक कार्य करून असंख्य विद्यार्थी घडविले. त्यांच्यावर चांगले संस्कार केले. समरसेन पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांचा विकास करून विद्यार्थ्यांना घडविण्याचे महान कार्य करून, ते समाजाचे शिल्पकार ठरले आहेत, असे स्पष्ट केले.
यावेळी संस्थेचे माजी सचिव सुभाष ओऊळकर, शिक्षक संघाचे राज्य अध्यक्ष सलीम कित्तूर, सागर कणबरकर, लक्ष्मण झांजरे, पुंडलिक नाकाडी,आदींची गुणगौरव पर भाषणे झाली. समरसेन पाटील यांचे सत्काराला उत्तर देणारे भाषण झाले; तर अँड राजाभाऊ पाटील यांचे अध्यक्षीय भाषण झाले.
याप्रसंगी सत्कारमूर्ती एस.डी. पाटील आणि त्यांच्या सहचारिणी समीक्षा पाटील यांचा संस्थेच्या वतीने शाल श्रीफळ, भेटवस्तू व पुष्पगुच्छ देऊन हृद्य सत्कार करण्यात आला.

यावेळी अनेक शाळा,पतसंस्था व संघटनाकडूनही सत्कार करण्यात आला.
श्रीमती एस.एन. पाटील यांनी सत्कारमूर्तींचा परिचय करून दिला; तर विद्यार्थिनीने मानपत्राचे वाचन केले.
यावेळी पी.सी. गोरल, कृष्णा अनगोळकर, पुंडलिक कणबरकर,
सुवर्णा लोहार, महादेव मंगण्णावर, पी.आर.पाटील, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
ए.पी. नाकाडी यांनी, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले; तर श्रीमती पी.एम. चव्हाण यांनी आभार मानले.

About Belgaum Varta

Check Also

किल्ले प्रतापगडावर सीमाप्रश्नाचा जागर; पुणे विभाग समितीचा पुढाकार

Spread the love  पुणे : महाराष्ट्र एकीकरण समिती पुणे विभागाच्या वतीने विश्वनाथ पाखरे यांच्या नेतृत्वाखाली …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *