Monday , August 17 2026
Breaking News

कॅन्टोन्मेंट बोर्ड मराठी प्राथमिक शाळेमध्ये युवा समिती आणि राज्य विकास मराठी संस्थेच्या वतीने शैक्षणिक साहित्याचे वितरण

Spread the love

 

बेळगाव : बेळगावमधील कॅन्टोन्मेंट बोर्ड मराठी प्राथमिक शाळेमध्ये महाराष्ट्र एकीकरण युवा समिती आणि राज्य विकास मराठी संस्थेच्या वतीने शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाळेचे मुख्याध्यापक प्रशांत बिर्जे यांनी सर्वांचे स्वागत करून, युवा समितीच्या उपक्रमाचे कौतुक केले. अध्यक्ष अंकुश केसरकर म्हणाले की, युवा समितीच्या वतीने मराठी शाळा टिकाव्या, पटसंख्या वाढावी यासाठी मागील नऊ वर्षांपासून हा उपक्रम राबविण्यात येत असून, त्यामध्ये इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन म्हणून शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात येते. शाळा टाकल्यानंतर मातृभाषा टिकणार आहे आणि मातृभाषा टिकली तरच आपली संस्कृती टिकणार आहे. यानंतर महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे कार्याध्यक्ष सचिन केळवेकर, खजिनदार विनायक कावळे, सरचिटणीस श्रीकांत कदम, आणि पदाधिकारी सुरज कुडुचकर, अक्षय बांबरकर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.

About Belgaum Varta

Check Also

किल्ले प्रतापगडावर सीमाप्रश्नाचा जागर; पुणे विभाग समितीचा पुढाकार

Spread the love  पुणे : महाराष्ट्र एकीकरण समिती पुणे विभागाच्या वतीने विश्वनाथ पाखरे यांच्या नेतृत्वाखाली …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *