Monday , August 17 2026
Breaking News

मार्केट पोलीस ठाण्याची कारवाई; धारदार ‘ड्रॅगन’ चाकूसह एक जण ताब्यात

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव शहरातील मार्केट पोलीस ठाण्याच्या हद्दीत ‘अँटी स्टॅबिंग स्क्वॉड’ पथकाने केलेल्या विशेष तपासणीदरम्यान एका व्यक्तीकडून बेकायदेशीररीत्या बाळगण्यात आलेला धारदार ड्रॅगन चाकू जप्त करण्यात आला. या प्रकरणी एका संशयिताला ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, मार्केट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जुन्या भाजी मार्केट परिसरात तपासणी सुरू असताना मल्लय्या ईरय्या पूजारी (वय ६०, रा. के. के. कोप्प, बेळगाव) हा संशयास्पदरीत्या फिरताना आढळला. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे बेकायदेशीररीत्या धारदार ड्रॅगन चाकू आढळून आला.

सहाय्यक पोलीस आयुक्त (मार्केट विभाग) रघू जे. यांच्या मार्गदर्शनाखाली, मार्केट पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जे. एम. कालिमिर्ची तसेच पोलीस उपनिरीक्षक मणिकंठ पूजारी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने आरोपीला ताब्यात घेत चाकू जप्त केला.

या प्रकरणी मार्केट पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १८३/२०२६ नोंद करण्यात आला असून शस्त्र अधिनियम १९५९ च्या कलम २७(१) तसेच कर्नाटक पोलीस अधिनियम १९६३ च्या कलम ९७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास मार्केट पोलीस करत आहेत.

दरम्यान, ही यशस्वी कारवाई करणाऱ्या पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक आणि त्यांच्या पथकाचे बेळगाव शहराचे पोलीस आयुक्त तसेच उपायुक्त (डीसीपी) यांनी कौतुक केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

किल्ले प्रतापगडावर सीमाप्रश्नाचा जागर; पुणे विभाग समितीचा पुढाकार

Spread the love  पुणे : महाराष्ट्र एकीकरण समिती पुणे विभागाच्या वतीने विश्वनाथ पाखरे यांच्या नेतृत्वाखाली …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *