

बेळगाव : हंस टॉकीज रोड, बेळगाव येथील ‘मंगलदीप टेक्स्टाईल मॉल’मध्ये भव्य वार्षिक ‘श्रावण सेल’ला दणक्यात सुरुवात झाली असून, ग्राहकांसाठी आकर्षक फॅशन, उत्कृष्ट दर्जा आणि अविश्वसनीय किमतींचा अनोखा संगम अनुभवण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे.
श्रावणातील सण-उत्सव, आगामी लग्नसराई आणि प्रत्येक खास प्रसंगासाठी महिला, पुरुष व लहान मुलांसाठी आधुनिक, पारंपरिक आणि ट्रेंडी वस्त्रांचा अफाट संग्रह येथे एकाच छताखाली उपलब्ध आहे. मनाला भुरळ घालणाऱ्या डिझाइन्स, दर्जेदार कापड आणि ग्राहकांच्या बजेटला साजेशी किंमत हीच मंगलदीपची खास ओळख आहे.
“इतक्या कमी किमतीत इतका दर्जेदार आणि वैविध्यपूर्ण वस्त्रसंग्रह अन्यत्र मिळणे कठीण,” असा विश्वास मंगलदीप टेक्स्टाईल मॉलच्या संचालकांनी व्यक्त केला आहे.
यंदाच्या १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनासाठी शुभ्र साड्यांचा आकर्षक व विशेष संग्रह, तसेच लग्नसराईसाठी खास साड्या, ड्रेस मटेरियल, रेडिमेड वस्त्रे आणि संपूर्ण कुटुंबासाठी फॅशनची पर्वणी ग्राहकांची वाट पाहत आहे.
श्रावणातील प्रत्येक सण अधिक रंगतदार आणि संस्मरणीय बनवायचा असेल, तर आजच संपूर्ण कुटुंबासह मंगलदीप टेक्स्टाईल मॉलला भेट द्या.
हा भव्य श्रावण सेल मर्यादित कालावधीसाठीच असल्याने, बेळगावकरांनी या सुवर्णसंधीचा लाभ घेऊन आपल्या आवडीच्या वस्त्रांची खरेदी अवश्य करावी, असे आवाहन मंगलदीप टेक्स्टाईल मॉलतर्फे करण्यात आले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta