


बेळगाव : कर्नाटक मंत्रिमंडळ विस्तारानंतर महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांना पुन्हा मंत्रिपद देण्याची मागणी करत बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी सोमवारी सायंकाळी राणी चन्नम्मा चौकात आंदोलन छेडले.
मंत्रिमंडळात लक्ष्मी हेब्बाळकर यांना स्थान मिळावे, तसेच बेळगाव जिल्ह्याला योग्य प्रतिनिधित्व मिळावे, या मागणीसाठी मोठ्या संख्येने कार्यकर्ते एकत्र आले. आंदोलनादरम्यान घोषणाबाजी करण्यात आली असून सरकारने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी आंदोलकांनी केली.
बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील विविध भागांतील काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर परिसरात पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला असून परिस्थिती शांततापूर्ण असल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, मंत्रिमंडळ विस्तारानंतर बेळगाव जिल्ह्याच्या प्रतिनिधित्वाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असून, लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या समर्थकांकडून सरकारने त्यांच्या नेतृत्वाचा योग्य सन्मान करावा, अशी भूमिका मांडण्यात येत आहे.

Belgaum Varta Belgaum Varta