Monday , August 17 2026
Breaking News

युवा समितीच्या वतीने खानापूर तालुक्यातील कुप्पटगिरी मराठी प्राथमिक शाळेत शैक्षणिक साहित्याचे वितरण

Spread the love

 

 

बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समिती आणि राज्य मराठी विकास संस्था, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने खानापूर तालुक्यातील कुप्पटगिरी गावांतील मराठी प्राथमिक शाळेमध्ये शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. मराठी शाळा जगल्यावर मराठी भाषा टिकणार आहे. त्यामुळे सर्वांनी मिळून मराठी शाळा वाचविण्यासाठी कटिबद्ध राहिले पाहिजे असे सामाजिक कार्यकर्ते शरद पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले.

मा.ग्रामपंचायत सदस्या आणि तथा सी. ए. पद्मश्री पाटील यांनी युवा समितीच्या उपक्रमाचे व युवा कार्यकर्त्यांचे कौतुक केले.
गेल्या नऊ वर्षांपासून युवा समितीच्या माध्यमातून सीमाभागातील मातृभाषेतून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण केले जात आहे. मराठी शाळांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणे आणि मराठी शाळांतील विद्यार्थ्यांची संख्या वाढविण्यासाठी सकारात्मक वातावरण निर्माण करणे, हा उद्देश ठेवून हा उपक्रम राबविण्यात येतो.
यावेळी विद्यार्थ्यांना अंकलिपी पुस्तिका, वह्या, पेन, पेन्सिल किट व इतर आवश्यक शैक्षणिक साहित्याचे वितरण उपस्थितीतांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी कुप्पटगिरी शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष गणपती मुतगेकर, उपाध्यक्ष गजानन पाटील आणि सदस्य शंकर पाटील, सारंग पाटील, विश्वनाथ बुवाजी, कल्लाप्पा पाटील, गोपाळ पाटील, शंकर पाटील, भाऊ पाटील, निळकंठ मुतगेकर, गोविंद पाटील आणि पल्लवी पाटील, मुख्याध्यापिका वंदना पाटील आणि इतर शिक्षकवर्ग महाराष्ट्र एकीकरण युवा समिती खानापुरचे कार्यकर्ते श्री पाटील, शुभम कांबळे, लक्ष्मण भातकांडे, सुदेश घाडी, पराशरराम पाटील, मुकेश गुरव, आदित्य कांबळे, साईनाथ मळीक, कृष्णा खांबले, श्रीहरी पाटील, तुषार देसाई आणि प्रज्योत पाटिल आदी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

खानापूरातील महामेळाव्यातील प्रक्षोभक भाषणाचा खटला निकाली; रामदास कदम, नितीन बानुगडे-पाटील निर्दोष

Spread the love  बेळगाव : कर्नाटक विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर २६ ऑक्टोबर २००६ रोजी खानापुरात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *