Monday , August 17 2026
Breaking News

मराठी विद्यानिकेतनमध्ये लोकमान्य टिळक पुण्यतिथी साजरी

Spread the love

 

बेळगाव : दिनांक १ ऑगस्ट २०२६ रोजी मराठी विद्यानिकेतनमध्ये लोकमान्य टिळक पुण्यतिथी साजरी करण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुण्या शाळेतील शिक्षिका शैला पाटील उपस्थित होत्या. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते लोकमान्य टिळकांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी चौथी ‘ब’ च्या विद्यार्थ्यांनी वर्गशिक्षिका स्नेहल पोटे यांच्या मार्गदर्शनाखाली वेगवेगळ्या भाषांतून भित्तीपत्रके तयार केली. चौथीचा विद्यार्थी विघ्नेश सूरज पाटील हा लोकमान्य टिळकांच्या वेशभूषेत तर विद्यार्थिनी सोमी मारुती पाटील मराठीत तर त्रिशा प्रशांत घाडी हिने इंग्रजी भाषेत लोकमान्य टिळकांच्याबाबत आपले मनोगत व्यक्त केले.
शाळेचे प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक बी.जी. पाटील, माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक नारायण उडकेकर, शिक्षण समन्वयक नीला आपटे, सविता पवार, सांस्कृतिक विभाग प्रमुख धीरजसिंह राजपूत, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

मंगळागौरीच्या पारंपरिक खेळांनी रंगला ‘सखी’चा सांस्कृतिक सोहळा

Spread the love  बेळगाव : महाराष्ट्राच्या समृद्ध लोकपरंपरेचा सुगंध, मंगळागौरीच्या खेळांचा उत्साह आणि महिलांच्या कलागुणांची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *