Monday , August 17 2026
Breaking News

बजरंग पाटील यांनी एमबीए (डिजिटल मार्केटिंग) पदवी संपादन करून यशाची नवी भरारी

Spread the love

 

बेळगाव (प्रतिनिधी) : अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद, कर्नाटक राज्याध्यक्ष तसेच राजर्षी शाहू विद्यालय, शिनोळी बु. येथील अध्यापक आणि सीमाकवी रवींद्र पाटील यांचे चिरंजीव बजरंग रवींद्र पाटील यांनी पुणे येथील झील कॉलेजमधून एमबीए (डिजिटल मार्केटिंग) ही पदव्युत्तर पदवी विशेष प्राविण्यासह संपादन करून शैक्षणिक यशाची नवी भरारी घेतली आहे.

मूळचे कुद्रेमानी, ता. व जि. बेळगाव येथील असलेल्या बजरंग पाटील यांनी माध्यमिक शिक्षण राजर्षी शाहू विद्यालय, शिनोळी बु. येथे पूर्ण केले. त्यानंतर पी.यू. ज्युनिअर कॉलेज, हलकर्णी येथून उच्च माध्यमिक शिक्षण घेतले. पुढे विवेकानंद कॉलेज, कोल्हापूर येथून बीबीए पदवी संपादन केली. त्यानंतर पुण्यातील झील कॉलेजमधून एमबीए पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करत डिजिटल मार्केटिंग या विषयात स्पेशलायझेशन केले.

रवींद्र पाटील यांच्या कुटुंबातील शैक्षणिक परंपरेलाही या यशाने नवी उंची मिळाली आहे. त्यांची कन्या रिलस्टार मानसी रवींद्र पाटील हिने बी.ई. (इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन) ही अभियांत्रिकी पदवी यशस्वीरित्या संपादन केली असून, कुटुंबातील दोन्ही अपत्यांनी उच्च शिक्षणात उल्लेखनीय यश मिळवून पालकांचा अभिमान वाढविला आहे.

बजरंग यांच्या या यशाबद्दल विविध शैक्षणिक, साहित्यिक, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांचे अभिनंदन होत असून, त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

About Belgaum Varta

Check Also

मंगळागौरीच्या पारंपरिक खेळांनी रंगला ‘सखी’चा सांस्कृतिक सोहळा

Spread the love  बेळगाव : महाराष्ट्राच्या समृद्ध लोकपरंपरेचा सुगंध, मंगळागौरीच्या खेळांचा उत्साह आणि महिलांच्या कलागुणांची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *