Monday , August 17 2026
Breaking News

मंगाई यात्रेपूर्वी रस्ते व नागरी सुविधा दुरुस्त करा; अन्यथा मनपासमोर आंदोलनाचा इशारा

Spread the love

 

बेळगाव : मंगाई यात्रेला अवघे दहा दिवस शिल्लक असताना मंगाई नगर परिसरातील रस्त्यांची दुरवस्था, ठिकठिकाणी पडलेले खड्डे आणि मूलभूत नागरी सुविधांचा अभाव याविरोधात मंगाई नगर रहिवासी संघ, महिला मंडळ आणि स्थानिक नागरिकांनी शुक्रवारी बेळगाव महानगरपालिकेत धडक देत उपायुक्त उदयकुमार तलवार यांना निवेदन सादर केले.

निवेदनात मंगाई नगर, वजह गल्ली, पाटील गल्ली, विष्णू गल्ली, कारवार गल्ली, यल्लमा रोड आणि धामणे रोड या परिसरातील रस्त्यांची अत्यंत बिकट अवस्था झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. मोठमोठ्या खड्ड्यांमुळे वाहनचालक, पादचारी, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक तसेच आपत्कालीन सेवांनाही अडथळ्यांचा सामना करावा लागत असल्याची तक्रार करण्यात आली.

रहिवासी संघाचे अध्यक्ष बंडू केरवाडकर यांनी, मंगाई यात्रेदरम्यान हजारो भाविक या परिसरात येणार असल्याने यात्रेपूर्वीच रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करून पिण्याचे पाणी, स्वच्छता, रस्ते आणि अन्य नागरी सुविधा सुरळीत कराव्यात, अशी मागणी केली.

यात्रेपूर्वी आठ दिवसांच्या आत ठोस उपाययोजना करण्यात आल्या नाहीत, तर मंगाई यात्रा संपल्यानंतर बेळगाव महानगरपालिका कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा नागरिकांनी यावेळी दिला.

यावर उपायुक्त उदयकुमार तलवार यांनी संबंधित विभागामार्फत तातडीने पाहणी करून आवश्यक त्या उपाययोजना राबविण्यात येतील, असे आश्वासन दिल्याची माहिती नागरिकांनी दिली.

About Belgaum Varta

Check Also

मंगळागौरीच्या पारंपरिक खेळांनी रंगला ‘सखी’चा सांस्कृतिक सोहळा

Spread the love  बेळगाव : महाराष्ट्राच्या समृद्ध लोकपरंपरेचा सुगंध, मंगळागौरीच्या खेळांचा उत्साह आणि महिलांच्या कलागुणांची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *