


बेळगाव : लेदर इंडस्ट्री डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (LIDKAR) चे बेळगाव जिल्हा संयोजक ए. आर. रुद्रेशी यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त लेदर असोसिएशन ऑफ कर्नाटकच्या वतीने नेहरूनगर, बेळगाव येथील LIDKAR शोरूममध्ये सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला.
यावेळी ए. आर. रुद्रेशी यांचा शाल, पुष्पहार, श्रीफळ आणि मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. रुद्रेशी यांनी आपल्या ४१ वर्षांच्या सेवाकाळात चर्मकार कारागीर आणि गोरगरीब चर्मकार बांधवांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी तसेच चर्मकार उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी मोलाचे कार्य केले.
बेळगाव जिल्ह्यात चर्मकार बांधवांना LIDKARची दुकाने मोफत उपलब्ध करून देणे, तसेच लोकप्रतिनिधींच्या सहकार्याने शहरातील मोक्याच्या ठिकाणी दुकाने मिळवून देण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. त्यांच्या या कार्यामुळे अनेक चर्मकार कुटुंबांना व्यवसायाची संधी मिळून ते स्वावलंबी झाले. प्रामाणिकपणे आणि सेवाभावाने चर्मकार समाजासाठी त्यांनी केलेल्या कार्याचे उपस्थितांनी कौतुक केले.
रुद्रेशी यांनी बेंगळुरू, चेन्नई, दिल्ली, दावणगेरे आणि हुबळी आदी ठिकाणी सेवा बजावल्यानंतर बेळगाव येथे सेवानिवृत्ती स्वीकारली.
यावेळी चेअरमन संतोष होंगल यांनी रुद्रेशी यांच्या कार्याचा विशेष गौरव करत त्यांच्या सेवाभावी योगदानाचे कौतुक केले. कार्यक्रमास हिरालाल चव्हाण, शिवाजी कांबळे, मुनेश्वर कुराडे, प्रमोद लाटे, चिकोर्डे, दीपक तोरे, संजय चौगुले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
बेळगाव शहर व उपनगरातील चर्मकार बांधव मोठ्या संख्येने कार्यक्रमास उपस्थित होते. हिरालाल चव्हाण यांनी आभार मानले.

Belgaum Varta Belgaum Varta