Friday , July 31 2026
Breaking News

बिजगर्णी हायस्कूलचे क्रीडांगण उद्याच्या स्पर्धेसाठी सज्ज

Spread the love

 

बिजगर्णी : सार्वजनिक शिक्षण खात्यामार्फत बेळगुंदी झोनल माध्यमिक शालेय स्पर्धां उद्यापासून बिजगर्णी हायस्कूलच्या पटांगणावर होत आहेत. पहिल्यांदाच बेळगाव पश्चिम ग्रामीण भागातील सतरा माध्यमिक शाळा सहभागी होणार आहेत. बेळगुंदी क्लस्टर व हिंडलगा क्लस्टर एकत्रितपणे या क्रीडा गंणावर विविध खेळांचा थरार पहायला मिळणार आहे.
सांघिक कबड्डी, खो- खो, हाॅलीबाॅल, थ्रोबाॅल, वैयक्तिक स्पर्धा मुलं मुली धावणे, लांब उडी, उंच उडी, भालाफेक, गोळा फेक, थाळी फेक आदी खेळासाठी चौदा वर्षे खालील व सतरा वर्षे खालील खेळाडू पूर्ण तयारीनिशी मैदानात उतरतांना दिसणार आहेत.

बिजगर्णी हायस्कूलकडे आयोजन असल्याने जोरदार तयारी सुरू केली आहे. जवळपास पाचशे खेळाडूंसाठी व्यवस्था करण्यात आली आहे. संस्थेचे पदाधिकारी व शिक्षक उत्साहात कामगिरी पूर्ण करण्यासाठी झटत असल्याचे दिसून येत आहे.
विविध खेळांचे मैदान सज्ज झाले आहे क्रीडा शिक्षक ए एम दरेकर, मुख्याध्यापक रमेश कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली उद्याच्या स्पर्धेसाठी तयारी पूर्ण झाल्याचे दिसून येत आहे

About Belgaum Varta

Check Also

पोलीस भरती लेखी परीक्षेसाठी बेळगावात २०० मीटर परिसरात जमावबंदी; ६१ केंद्रांवर २ ऑगस्टला परीक्षा

Spread the love    बेळगाव : राज्य पोलीस दलातील रिक्त पदे भरण्याच्या प्रक्रियेला वेग आला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *