


बेळगाव : अनगोळ येथील संत मीरा इंग्रजी माध्यम शाळेच्या माधव सभागृहात गुरुपौर्णिमेनिमित्त संत मीरा शाळेच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून चिन्मय मिशनच्या स्वामिनी प्रज्ञानंदजी, डॉ जयतीर्थ कुलकर्णी, शाळेचे अध्यक्ष परमेश्वर हेगडे, मुख्याध्यापिका सुजाता दप्तदार व्यासपीठावर उपस्थित होते . प्रारंभी पाहुण्यांच्या हस्ते ओंकार सरस्वती भारत माता फोटो पूजन व दीपप्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले, विद्यार्थ्यांनी गुरु स्तोत्रचे पठण केले याप्रसंगी शाळेचे विद्यार्थीनी संभवी स्वामी, मानवी चिंचवडकर, यांनी गुरुचे महत्व सांगितले तर श्राव्या भट्ट हिने गीत गायले, यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते 2026 दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या पूर्वी शेट्टी, श्रावणी मोरे, भक्ती कुंभार, सहना सोलंकर, मनाली जुवेकर, सायना मजुकर, आकांक्षा बोकम्मुरकर, स्नेहा धनवडे, वर्षा परीट, सर्वेश तेवरे, श्रावणी मेरवा.
या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला तसेच आठवी व नववी परिक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा रोख रक्कम प्रमाणपत्र चषक देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी 2025 26 सालाच्या आदर्श शिक्षिका म्हणून शामल दड्डीकर, व माया निलजकर यांचा गौरव करण्यात आला तसेच शाळेच्या शिपाई सुरेखा शहापूरकर, ज्योती अनिगोळ यांचाही सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी शाळा सुधारणा समिती सदस्य रजनी गुर्जर, माधव पुणेकर, किशोर काकडे, नीता अनगोळकर, मयूर कुलकर्णी, संतोष देशपांडे, उपमुख्याध्यापिका ऋतुजा जाधव व शिक्षक वर्ग उपस्थित होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किरण पावसकर, सविता पाटणकर, रूपाली जोशी तर सुजाता पाटील यांनी आभार मानले शांती मंत्राने कार्यक्रमाची सांगता झाली.

Belgaum Varta Belgaum Varta