Friday , July 31 2026
Breaking News

बुडा अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे यांनी दिला गरीब कुटुंबातील विद्यार्थिनीला लॅपटॉप

Spread the love

 

 

निपाणी (वार्ता) : मिरापुरहट्टी (ता. चिकोडी) येथील गरीब कुटुंबातील विद्यार्थिनी बेळगाव येथील जैन इंजीनियरींग महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. परिस्थितीने गरीब पण हुशार असलेली मुलगी तेजस्वीनी लकाप्पा कजज्जीडोने हिला लॅपटॉपची गरज होती. त्यामुळे तिने आपल्या वडिलांसह चिक्कोडीतील जिल्हा काँग्रेस कार्यालयात बुडा व चिक्कोडी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे यांना भेटुन लॅपटॉप नसल्याने इंजीनियरींगचे शिक्षन घेण्यास अडचणी येत असल्याचे सांगितले.
लक्ष्मणराव चिंगळे यांनी क्षणाचाही विचार न करता विद्यार्थिनीला दुकानात घेऊन जाऊन लॅपटॉप दिला. यापुढील शिक्षणासाठी कसलीही मदत हवी आसल्यास आपल्याशी संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी बसवराज पाटील, दिपक सावंत, प्रमोद पाटील, जरारखान पठाण, बाळासाहेब कमते, लोकेश घस्ते, समीर काझी, सुखदेव मगदुम यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी मुलीसह तिच्या वडीलानी चिंगळे यांचा सत्कार केला.

About Belgaum Varta

Check Also

विद्यार्थ्यांनी डिजिटल तंत्रज्ञानाचा सकारात्मक वापर करावा

Spread the love    प्राचार्य एम. एम. हुरळी‌; बागेवाडी महाविद्यालयात एकदिवसीय कार्यशाळा निपाणी (वार्ता) : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *