Sunday , September 20 2026
Breaking News

पोलीस भरती लेखी परीक्षेसाठी बेळगावात २०० मीटर परिसरात जमावबंदी; ६१ केंद्रांवर २ ऑगस्टला परीक्षा

Spread the love

 

 

बेळगाव : राज्य पोलीस दलातील रिक्त पदे भरण्याच्या प्रक्रियेला वेग आला असून, ३,३९५ सिव्हिल पोलीस कॉन्स्टेबल पदांच्या भरतीसाठी येत्या २ ऑगस्ट रोजी लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर बेळगाव जिल्ह्यातील सर्व परीक्षा केंद्रांभोवती जमावबंदीचे आदेश जारी करण्यात आले आहेत.

जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यात ६१ परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा पार पडणार आहे. परीक्षेदरम्यान कोणताही गैरप्रकार होऊ नये आणि शांततेत परीक्षा पार पडावी यासाठी प्रत्येक परीक्षा केंद्राच्या २०० मीटर परिसरात जमावबंदी लागू करण्यात आली आहे.

तसेच परीक्षा केंद्राच्या आवारात परीक्षार्थी, परीक्षा कर्मचारी आणि शासनाने नियुक्त केलेले अधिकारी यांनाच प्रवेश दिला जाणार आहे. इतर कोणालाही परीक्षा केंद्र परिसरात प्रवेशाची परवानगी राहणार नाही.

याशिवाय, परीक्षा काळात केंद्राबाहेरील झेरॉक्स केंद्रे बंद ठेवण्याच्या सूचना संबंधितांना देण्यात आल्या आहेत. परीक्षेची पारदर्शकता आणि सुरक्षितता कायम राखण्यासाठी प्रशासनाने आवश्यक ती सर्व खबरदारी घेतली असून, उमेदवारांनी नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *