


निपाणी (वार्ता) : निपाणी शहराबाहेरील रोहिदासनगर मधील संत गजानन महाराज मंदिरात गुरुपौर्णिमा कार्यक्रम पार पडला. पौर्णिमेनिमित मंदिरातील मूर्तीची आकर्षक पूजा बांधण्यात आली होती. यावेळी दिवसभर भाविकांनी दर्शनासह महाप्रसादासाठी गर्दी केली होती.
काकड आरती, सकाळी माऊलींच्या मूळ मूर्तीस अभ्यंगस्नान, अभिषेक घालून आरती झाली. त्यानंतर ५१ महिलांच्या उपस्थितीत पारायण झाले. दुपारी महाप्रसाद व मनोचीवाडी येथील भजनी मंडळाचा कार्यक्रम पार पडला. सायंकाळी महाआरतीनेउत्सवाची सांगता झाली. यावर्षी मंदिर सजवण्याची सेवा प्रत्येक भक्तावर असेल. ज्या भक्तांना शक्य होईल त्यांनी मंदिरात येऊन स्वतःऊस अथवा केळीचे झाड आणून मंदिराची आकर्षक सजावट केली होती.
यावेळी माजी जिल्हा पंचायत सदस्य राजेंद्र वड्डर, अभिषेक पाटील, शैलजा पाटील यांच्यासह भाविक उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta