Sunday , September 20 2026
Breaking News

अक्कोळ येथील पार्श्वभूमी विद्यालयात गणवेश, शैक्षणिक साहित्याचे वितरण

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : अक्कोळ येथील श्री पार्श्वमती विद्यालयात शालेय गणवेश आणि शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. अध्यक्षस्थानी अक्कोळ गावचे गावकामगार पाटील राजू पाटील होते.

प्रारंभी आचार्य श्री १०८ गुरुदेव समंतभद्र महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
मुख्याध्यापक डॉ. राकेश तावदारे यांनी शालेय गणवेश आणि शैक्षणिक साहित्य गरजेचे असून विद्यार्थ्यांच्या जीवनातील महत्त्व आहे. गणवेशामुळे विद्यार्थ्यांमध्ये समानतेची भावना, शिस्त, आत्मविश्वास व एकात्मता निर्माण होत असल्याचे सांगितले.
राजू पाटील, यांनी शिक्षण हेच विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सर्वात प्रभावी साधन आहे. विद्यार्थ्यांनी चारित्र्य, शिस्त, प्रामाणिकपणा आणि सामाजिक बांधिलकी जोपासत शिक्षण घेण्याचे आवाहन केले.
यावेळी दादासाहेब मगदूम, अशोक व्हनशट्टी, अण्णासाहेब सोळांकुरे , टी. ए. घोसरवाडे, व्ही. डी. इंदलकर, एस. डी. खोत, टी. ए. देसाई, एस. एस. मगदूम यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, उपस्थित होते. पी. बी. कळंत्रे यांनी सूत्रसंचालन केले केले.

About Belgaum Varta

Check Also

प्रत्येक क्षेत्रातील अभियंत्यांचे योगदान महत्त्वाचे

Spread the love  जयश्री पाटील ; निपाणीत अभियंता दिन कार्यक्रम निपाणी (वार्ता) : अभियंता म्हणजे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *