Sunday , September 20 2026
Breaking News

निपाणी, ममदापूर येथे सिद्धोजीराजे पुण्यतिथी निमित्त विविध कार्यक्रम

Spread the love

 

 

निपाणी (वार्ता) : निपाणी येथील जोल्ले शिक्षण संस्था संचलित श्रीमंत ‌सिद्धोजीराजे पदवीपूर्व कॉलेजमध्ये सिद्धोजीराजे राजे यांची पुण्यतिथी झाली. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते त्यांच्या प्रतिमेचे पूजन झाले. प्रमुख पाहुणे म्हणून श्रीमंत दादाराजे निपाणकर -सरकार उपस्थित होते.
यावेळी दादाराजे यांनी सिद्धोजीराजे यांच्या कार्याला उजळा देत विद्यार्थ्यांना त्यांच्या कार्याचे माहिती दिली. कार्यक्रमास प्राचार्य जी. एस. सदलगे, प्राचार्य आर. व्ही. खोत, बीसीए विभागाचे समन्वयक प्रानेश्वर रजपूत, किरण माने, सुनील खोत यांच्यासह विद्यार्थी, प्राध्यापक उपस्थित होते. प्रा. यु. एस. सप्तसागर यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. डी. व्ही. सोलापुरे यांनी आभार मानले.
ममदापूर (के. एल.) येथील तुळजा भवानी मंदिरामध्ये श्रीमंत सिद्धोजीराजे -निपाकर यांना अभिवादन करण्यात आले. आप्पासाहेब पुजारी, माजी नगराध्यक्षा नम्रता कमते, रोहिणी पाटील -देसाई यांच्या हस्ते निपाणकरांच्या प्रतिमेचे पूजन झाले.
कार्यक्रमास श्रीकांत पुजारी, प्रमोद पिंजारी, प्रसाद पुजारी, ओमकार पुजारी, चंद्रकांत पुजारी, शरद पुजारी, बाळासाहेब पाटील, अण्णासाहेब कदम, सुरेश कामते, भरत पाटील, नामदेव हरेल, मोहन कमते, मच्छिंद्र कमते, बाळासाहेब यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. भरत पुजारी यांनी आभार मानले.

About Belgaum Varta

Check Also

प्रत्येक क्षेत्रातील अभियंत्यांचे योगदान महत्त्वाचे

Spread the love  जयश्री पाटील ; निपाणीत अभियंता दिन कार्यक्रम निपाणी (वार्ता) : अभियंता म्हणजे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *