Sunday , September 20 2026
Breaking News

विद्यार्थ्यांनी डिजिटल तंत्रज्ञानाचा सकारात्मक वापर करावा

Spread the love

 

 

प्राचार्य एम. एम. हुरळी‌; बागेवाडी महाविद्यालयात एकदिवसीय कार्यशाळा

निपाणी (वार्ता) : विद्यार्थ्यांनी आपले ज्ञान, कौशल्ये आणि रोजगाराच्या संधी वाढवण्यासाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा सकारात्मक वापर केला पाहिजे. त्यासाठी आता सर्व ठिकाणी विविध प्रकारच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. आपल्या आवडीनिवडीनुसार तर त्यामध्ये काम करावे, असे आवाहन प्राचार्य एम. एम. हुरळी यांनी केले. केली संस्थेच्या येथील जी. आय. बागेवाडी महाविद्यालयात कन्नड विभाग, ग्रंथालय व माहिती केंद्राच्या संयुक्त विद्यमाने विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात ‘विद्यार्थ्यापासून यूट्यूब स्टारपर्यंत, शिका, निर्माण करा आणि प्रेरणा द्या, या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा पार पडली. त्यावेळी अध्यक्षानावरून डॉ. हुरळी बोलत होते.
व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते रोपाला पाणी घालून कार्यक्रमाचे उद्घाटन झाले.तांत्रिक सत्रांमध्ये, मुथुराज कारीगार यांनी यशस्वी यूट्यूब चॅनल कसे सुरू करावे, याचे प्रात्यक्षिक करून दाखवले.

विठ्ठल कोटे यांनी मोबाईल व्हिडिओ शूटिंग तंत्रावर, मयुरा हेलावी यांनी इंस्टाग्राम कंटेंट क्रिएशन आणि ब्रँडिंगवर, तर बसवराजा झांबी यांनी कॅपकटद्वारे व्हिडिओ एडिटिंगवर मार्गदर्शन केले. यूट्यूब मॉनेटायझेशन, आर्टिफिशियल इंटेलिजन्स टूल्स आणि करिअरच्या संधी यावर माहिती देण्यात आली.
यावेळी समन्वयक डॉ. अतुलकुमार कांबळे, प्रा. शंकरमूर्ती के. एन., डॉ. एम. डी. गुरव, प्रियांका कमते, डॉ. एस. एस. कुंभार डॉ. विनोद मगदुम, गीता क कमते यांच्यासह १३० हून अधिक विद्यार्थी उपस्थित होते. कार्यशाळा समन्वयक डॉ. बसवराज जनगौडा यांनी स्वागत केले. डॉ. आनंद केंचक्कानावर यांनी प्रास्ताविक केले. यशस्विनी असोदे यांनी आभार मानले.

About Belgaum Varta

Check Also

प्रत्येक क्षेत्रातील अभियंत्यांचे योगदान महत्त्वाचे

Spread the love  जयश्री पाटील ; निपाणीत अभियंता दिन कार्यक्रम निपाणी (वार्ता) : अभियंता म्हणजे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *