Friday , July 31 2026
Breaking News

मैत्रीची साक्ष… आमचा सच्चा मित्र ‘विनू’…

Spread the love

 

“मित्र वनव्यातील गारव्यासारखा…”
आमचे आणि विनोदचे नातेही अगदी असेच होते. तो आमच्यासाठी विनोद भागवत नव्हता, तर आमचा लाडका ‘विनू’ होता.

महाद्वार रोडवरील आमच्या मित्रपरिवाराचा तो जणू श्वासच होता. गेल्या ३५ वर्षांपासून जपलेली आमची मैत्री म्हणजे जन्मोजन्मीच्या नात्याची साक्षच होती.

विनू म्हणजे मित्र, सखा, सोबती, मार्गदर्शक… प्रसंगी हक्काचा लहान भाऊ, तर कधी मोठा भाऊ. प्रत्येकाच्या आयुष्यात त्याचे स्थान वेगळे, पण तितकेच जिव्हाळ्याचे होते.

सुखात आनंद साजरा करणे आणि दुःखात खंबीरपणे एकमेकांच्या पाठीशी उभे राहणे, हीच आमच्या मैत्रीची खरी ओळख होती. आमचा मित्र एक निष्ठावान आणि भक्कम कार्यकर्ता आहे, याचा आम्हा सर्व मित्रांना नेहमीच अभिमान वाटायचा.

असा एकही दिवस जात नसे, ज्या दिवशी आमचे बोलणे होत नसे. दिवसभराची कामे आटोपल्यानंतर सायंकाळी प्रत्यक्ष भेट किंवा फोनवरून संवाद हा आमच्या दिनक्रमाचाच भाग होता. भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता म्हणून तो आपली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडत होता, पण मित्रांमध्ये तो नेहमीच आमच्यातलाच एक राहिला. हाच आमच्या मैत्रीचा खरा पुरावा होता.

वेदनादायक बाब म्हणजे, त्याच्या निधनाच्या आदल्या दिवशीही “कुठे आहेस? भेटूया का?” असा त्याचा फोन आला होता. मात्र ती भेट काही होऊ शकली नाही… आणि दुसऱ्याच दिवशी विनू आम्हा सर्वांना कायमचा सोडून गेला.

त्याचे अकाली जाणे मनाला कायमचा चटका लावून गेले. त्याच्या जाण्याने निर्माण झालेली मैत्रीची पोकळी कधीच भरून निघणार नाही.

आमच्या सच्च्या मित्राला भावपूर्ण श्रद्धांजली!
ईश्वर त्याच्या पवित्र आत्म्यास चिरशांती देवो, हीच विनम्र प्रार्थना.

– विनूचा मित्रपरिवार

About Belgaum Varta

Check Also

गुरुवर्य वि. गो. साठे मराठी प्रबोधिनीच्यावतीने २३ ऑगस्ट रोजी मराठी व्याकरण, हस्ताक्षर व निबंध स्पर्धांचे आयोजन

Spread the love  बेळगाव : गुरुवर्य वि. गो. साठे मराठी प्रबोधिनी, बेळगाव यांच्या कार्यकारिणीची बैठक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *