Sunday , September 20 2026
Breaking News

मराठा मंडळच्या तीन शाळांमध्ये गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी; 1988 च्या माजी विद्यार्थ्यांकडून गुरुजनांचा सन्मान

Spread the love

 

 

बेळगाव : मराठा मंडळ हायस्कूल (चव्हाट गल्ली), मराठा मंडळ सेंट्रल हायस्कूल आणि जिजामाता हायस्कूल येथे गुरुपौर्णिमा उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. यावेळी सेंट्रल हायस्कूलच्या 1988 सालच्या माजी विद्यार्थ्यांनी संयुक्तपणे गुरुजनांचा सत्कार करून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली.

“गुरु ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः…” या श्लोकाचा उल्लेख करत मानवी जीवनातील गुरुचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. ज्ञानाचा प्रकाश देणाऱ्या आणि योग्य मार्ग दाखविणाऱ्या गुरुजनांप्रती आदर व कृतज्ञता व्यक्त करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम दरवर्षी आयोजित केला जात असल्याचे आयोजकांनी सांगितले.

कार्यक्रमात सर्व शिक्षकांना श्रीफळ, धार्मिक ग्रंथ आणि स्मृतिचिन्ह भेट देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठा मंडळाचे मुख्याध्यापक एम. के. पाटील होते. सेंट्रल हायस्कूलचे ज्येष्ठ शिक्षक डी. टी. सावंत, जिजामाता हायस्कूलच्या ज्येष्ठ शिक्षिका नीलू पावशे यांच्यासह तिन्ही शाळांतील शिक्षक व्यासपीठावर उपस्थित होते.

कार्यक्रमाची प्रस्तावना डी. टी. सावंत यांनी केली. यावेळी 1988 च्या बॅचमधील मराठा बँकेचे संचालक विनोद हंगिरगेकर, प्रफुल शिरवलकर, गिरीश धामणेकर, गजानन बांदेकर, ह.भ.प. राजू महाराज कावळे, संजय हिशोबकर, लक्ष्मीकांत हावळ, चंद्रशेखर पाटणकर, विकास मांडेकर, कलाप्पा हांडे, विलास लाड, विनोद चौगुले, अनिल गुंडूचे आदी माजी विद्यार्थी उपस्थित होते. तसेच विद्यमान विद्यार्थ्यांच्या प्रतिनिधींनीही शिक्षकांना पुष्प, श्रीफळ आणि लेखणी भेट देऊन गुरुजनांप्रती आदर व्यक्त केला.

समारोपात मुख्याध्यापक एम. के. पाटील यांनी गुरुचे महत्त्व विशद करत 1988 च्या माजी विद्यार्थ्यांचे आभार मानले. “दरवर्षी गुरुपौर्णिमेनिमित्त माजी विद्यार्थी येऊन शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करतात, ही परंपरा प्रेरणादायी असून भविष्यातही अशाच विद्यार्थ्यांची घडण व्हावी,” अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

या कार्यक्रमास तिन्ही शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, माजी विद्यार्थी तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *