Sunday , September 20 2026
Breaking News

गुरुवर्य वि. गो. साठे मराठी प्रबोधिनीच्यावतीने २३ ऑगस्ट रोजी मराठी व्याकरण, हस्ताक्षर व निबंध स्पर्धांचे आयोजन

Spread the love

 

बेळगाव : गुरुवर्य वि. गो. साठे मराठी प्रबोधिनी, बेळगाव यांच्या कार्यकारिणीची बैठक नुकतीच उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. बैठकीत संस्थेच्या आगामी शैक्षणिक व भाषिक उपक्रमांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

यावेळी विद्यार्थ्यांमध्ये मराठी भाषेबद्दल प्रेम निर्माण व्हावे, भाषिक कौशल्यांचा विकास व्हावा तसेच लेखन व अभिव्यक्ती क्षमता वृद्धिंगत व्हावी या उद्देशाने २३ ऑगस्ट २०२६ रोजी “मराठी व्याकरण स्पर्धा, हस्ताक्षर स्पर्धा आणि निबंध स्पर्धा” आयोजित करण्याचा एकमताने निर्णय घेण्यात आला.

या स्पर्धांमध्ये विविध शाळांतील विद्यार्थ्यांना सहभागी करून घेण्यात येणार असून स्पर्धांच्या नियमावली, गटविभागणी व वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. मराठी भाषेच्या संवर्धनासाठी अशा उपक्रमांचे सातत्याने आयोजन करण्याचा संस्थेचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

बैठकीस प्रबोधिनीचे सचिव श्री. सुभाष ओऊळकर, सुरेश गडकरी, विजय बोंगाळे, बसवंत शहापूरकर, नीला आपटे, सविता पवार, नारायण उडकेकर, बी. जी. पाटील, बी. बी. शिंदे, इंद्रजीत मोरे, गजानन सावंत, धीरज राजपूत हे कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते. सर्वांनी स्पर्धांच्या यशस्वी आयोजनासाठी आवश्यक नियोजनावर चर्चा करून विविध जबाबदाऱ्यांचे वाटप केले. मराठी भाषेच्या विकासासाठी अधिकाधिक विद्यार्थ्यांनी या स्पर्धांमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन गुरुवर्य वि. गो. साठे मराठी प्रबोधिनीच्या वतीने करण्यात आले.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *