Thursday , August 27 2026
Breaking News

सावगावच्या कलमेश्वर मंदिरात मध्यरात्री चोरी; ५५ किलोचा मुखवटा, घंटेसह मौल्यवान साहित्य लंपास

Spread the love

 

बेळगाव : तालुक्याच्या पश्चिम भागातील सावगाव येथील श्री कलमेश्वर मंदिरात मध्यरात्री चोरी झाल्याची घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली. मंदिरातील मौल्यवान साहित्य चोरीला गेल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

ग्रामस्थांच्या माहितीनुसार, रात्री दोनच्या सुमारास चोरट्याने मंदिरात प्रवेश केल्याचा संशय आहे. चोरट्याने मंदिरातील सुमारे ५५ किलो वजनाचा मुखवटा, २५ किलो वजनाची घंटा, समई, अॅम्प्लिफायर तसेच महाप्रसादासाठी वापरण्यात येणारी भांडी असा मुद्देमाल लंपास केला.

गुरुवारी सकाळी मंदिरात चोरी झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर ग्रामस्थांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच बेळगाव ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली.

मंदिरातील चोरीप्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला असून, चोरट्याचा शोध घेण्यासाठी आवश्यक कार्यवाही केली जात आहे. चोरीच्या या घटनेमुळे सावगाव परिसरातील नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत असून, चोरीचा छडा लावून आरोपीला तातडीने अटक करण्याची मागणी होत आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘जपून जपून जा रे… पुढे खड्डा आहे!’

Spread the love  कॅन्टोन्मेंटमधील रस्त्यांची अक्षरशः चाळण; खड्ड्यांत पाणी साचल्याने अपघाताचा धोका वाढला बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *