
बेळगाव (प्रतिनिधी) : मराठी भाषा प्रेमी मंडळ, बेळगाव या संस्थेतर्फे रविवार दि. 30 आँगस्ट 2026 रोजी बृहन्महाराष्ट्र मंडळ, नवी दिल्ली या संस्थेचे जेष्ठ अध्यक्ष दिलीप कुंभोजकर यांची अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल या निमित्त सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम कॉलेज रोडवरील महिला विद्यालय मराठी माध्यम हायस्कूलच्या सभागृहात सकाळी 11.30 ते दुपारी 1.30 वाजेपर्यंत होणार आहे. यावेळी व्यासपीठावर मराठी भाषा प्रेमी मंडळाचे अध्यक्ष- प्रा. अनिल चौधरी, सत्कारमूर्ती दिलीप कुंभोजकर (अध्यक्ष बृ.म.मंडळ, नवी दिल्ली), प्रमुख अतिथी प्रा. आनंद मेणसे, विशेष अतिथी प्रा. दत्ता नाडगौडा, सह-कोषाध्यक्ष- नितीन कपिलेश्वरकर, विभागीय कार्यवाह- परशराम माळी उपस्थित राहणार आहेत. सत्कार समारंभानंतर भोजन कार्यक्रम दु. 1.30 ते 2.30 या वेळेत होणार आहे. या कार्यक्रमास आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे.
इतर उपस्थित संस्था पदाधिकारी व प्रतिनिधीनी कृपया आपली नावे तेथेचं नोंदवावीत, असे आवाहन बापूसाहेब देसाई, कुमार पाटील, प्रभाकर हलगेकर मराठी भाषा प्रेमी मंडळ, बेळगाव यांनी केले आहे.

Belgaum Varta Belgaum Varta