Thursday , August 27 2026
Breaking News

भाचीशी बोलण्यास विरोध; युवकाला बेदम मारहाण

Spread the love

 

गौंडवाड येथील प्रकार; जीवे मारण्याची धमकी, काकती पोलिसांत गुन्हा

बेळगाव : गणेशपूर येथील युवकाला ‘माझ्या भाचीशी बोलू नकोस’ अशी ताकीद दिल्याच्या रागातून मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना गौंडवाड येथे घडली. याप्रकरणी काकती पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

गजानन परशुराम कुंडेकर (वय ३७, मूळ रा. हंगरगे, सध्या रा. गणेशपूर) असे मारहाणीत जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गजानन कुंडेकर यांनी विघ्नेश याला आपल्या भाचीशी बोलू नये, अशी ताकीद दिली होती. यावरून दोघांमध्ये वाद निर्माण झाला. वाद विकोपाला गेल्यानंतर गजानन यांना मारहाण करण्यात आली. तसेच त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

घटनेनंतर गजानन यांनी काकती पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा नोंदवून घटनेचा तपास सुरू केला आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘जपून जपून जा रे… पुढे खड्डा आहे!’

Spread the love  कॅन्टोन्मेंटमधील रस्त्यांची अक्षरशः चाळण; खड्ड्यांत पाणी साचल्याने अपघाताचा धोका वाढला बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *