Thursday , August 27 2026
Breaking News

श्री महात्मा बसेश्वर क्रेडिट सौहार्द संस्थेतर्फे महात्मा बसवेश्वर, अक्कमहादेवी वचन कंठपाठ, वक्तृत्व वेशभूषा स्पर्धेचे आयोजन

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : निपाणी येथील चिक्कोडी रोडवरील श्री महात्मा बसवेश्वर क्रेडिट सौहार्द संस्थेतर्फे श्री महात्मा बसवेश्वर व जगन्माता अक्कमहादेवी जयंती आणि शिक्षक दिनानिमित्त चिक्कोडी तालुक्यातील विद्यार्थ्यासाठी शनिवारी (ता.५) दुपारी १ वाजता श्री महात्मा बसवेश्वर क्रेडिट सौहार्द सहकारी नियमित निपाणी मुख्य कार्यालय महात्मा बसवेश्वर सभागृहात स्पर्धेचे आयोजन केले आहे.तरी इच्छुक स्पर्धकांनी आपली नावे मुख्य कार्यालयात किंवा नजीकच्या शाखेशी संपर्क करण्याचे आवाहन संस्थेतर्फे केले आहे. स्पर्धेमध्ये सहभाग घेतलेल्या स्पर्धकांचा प्रमाणपत्र व स्मृति चिन्ह देऊन गौरव करण्यात येईल.
या स्पर्धा पाच गटांमध्ये होणार असून स्पर्धेचे माध्यम मराठी कन्नड, इंग्लिश पहिला गट इयत्ता पहिली ते पाचवी वचन व कंठपाठ स्पर्धा, दुसरा गट सहावी ते नववी वचन व कंठ पाठ स्पर्धा तिसरा गट पहिली ते पाचवी अशा स्वरूपात राहील. वक्तृत्व स्पर्धेसाठी आजच्या मुलांना शिवशरण यांच्या वचनाचे ज्ञान देण्याची गरज, हानगल कुमारेश्वर यांचे बालपण, शिक्षण व योगदान, कर्नाटकचे सांस्कृतिक नेते बसवांन्ना सहावी ते नववी वक्तृत्व स्पर्धेसाठी विश्वगुरू बसवेश्वरांच्या वचनातील जीवनमूल्य, वैराग्य निधी अक्कमहादेवी यांचे जीवन व वचन संदेश, आजच्या जीवनात अध्यात्माचे महत्त्व, पहिली ते सातवी वेशभूषा स्पर्धेसाठी महात्मा बसवेश्वरांचे व जगन्माता अक्कमहादेवी व इतर शिवशरणांची वेशभूषा असे विषय देण्यात आले आहेत. तरी जास्तीत जास्त स्पर्धकांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन संस्थेचे सहकार रत्न संस्थापक अध्यक्ष डॉ. सी. बी. कुरबेट्टी, विद्यमान अध्यक्ष किशोर बाली आणि संचालक मंडळाने केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

निपाणी तालुका छायाचित्रकार, व्हिडिओग्राफर संघटनेतर्फे ए.आय. बाबत एकदिवशीय मार्गदर्शन शिबिर

Spread the love  निपाणी (वार्ता) : निपाणी येथील निपाणी तालुका छायाचित्रकार आणि व्हिडिओग्राफर संघटनेतर्फे बुधवारी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *