
निपाणी (वार्ता) : गडहिंग्लज येथील श्री रवळनाथ को-ऑप. हौसिंग फायनान्स सोसायटी (मल्टी-स्टेट) प्संस्थेच्या येथील शाखेचा ९ वा वर्धापनदिन पार पडला. येथील बालरोगतज्ञ डॉ. महेश कोरे यांच्या हस्ते रवळनाथ प्रतिमापूजन झाले. अध्यक्षस्थानी रवळनाथचे संस्थापक अध्यक्ष एम. एल. चौगुले होते. यावेळी सेवानिवृत्त सभासद, यशवंत पाल्यांचा सत्कार करण्यात आला. तर प्राचार्य डॉ. आर. एस. निळपणकर, शाखा अध्यक्ष प्राचार्य डॉ. एम. बी. कोथळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
एम. एल. चौगुले म्हणाले, स्थापनेपासून संस्थेने विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपली आहे संस्थेमार्फत सर्वशाखांमध्ये मोबाईल बँकिंग, अद्ययावत सर्व डिजीटल बँकिंग सेवा दिल्या जातात. संस्थेतर्फे आरटीजीएसटी, नेफ्ट सुविधा, वीजबील भरणा यासह जेष्ठ नागरिक तसेच गंभीर आजारी व वयोवृध्द ग्राहकांना घरपोच सेवा दिली जाते. आकर्षक व्याजदर मिळणा-या विविध ठेव योजनांना चांगला प्रतिसाद मिळत आहे.
यावेळी उमेश कोरे, शहेनशहा मुल्ला यांच्या सेवानिवृत्ती निमित्त, श्रावणी सावंत, श्रावणी शेवाळे या सभासदांच्या यशवंत पाल्यांचा सत्कार करण्यात आला. सेवानिवृत्त सत्कारमुतींनी कृतज्ञता व्यक्त केली. प्रा. डॉ. प्रविणसिंह शिलेदार यांनी सुत्रसंचालन केले. प्रशांत रामनकट्टी यांनी आभार मानले. कार्यक्रमास संचालक प्राचार्य डॉ. मनोहर पुजारी, शाखा सल्लागार व्ही. आर. पाटील, प्राचार्य डॉ. शिवाजी होडगे, डॉ. सिद्धगौडा पाटील, शाखा सल्लागार रश्मी व्हदडी, प्रा. विभावरी खांडके, प्रा. आनंदी कांबळे-पुजारी, शाखाधिकारी बसवराज चौगुले यांच्या सह सभासद ठेवीदार, विद्यार्थी उपस्थित होते.

Belgaum Varta Belgaum Varta