Wednesday , August 26 2026
Breaking News

बिदर जिल्हा महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत मराठीसाठी ठराव

Spread the love

 

 

भालकी : बिदर जिल्हा महाराष्ट्र एकीकरण समितीची महत्वपूर्ण बैठक बुधवार, दि. २६ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी १२.३० वाजता विवेकानंद को-ऑपरेटिव्ह सोसायटी लि., भालकी येथे पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी किशनराव पाटील (इंचूरकर) होते. अॅड. भास्कर कुलकर्णी यांनी बैठकीचे प्रास्ताविक व उपस्थितांचे स्वागत केले.

बैठकीत बिदर जिल्ह्यातील मराठी भाषिकांच्या विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. विशेषतः मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये शिक्षकांची आवश्यक पदे मंजूर करावीत तसेच शासकीय व अशासकीय कार्यालयांच्या फलकांवर मराठी भाषेत नावे लावण्यात यावीत, या प्रमुख मागण्यांवर चर्चा झाली.

यावेळी अॅड. भास्कर कुलकर्णी, विठ्ठलराव पाटील (बाळूर), राम रावणगावे, किशनराव पाटील (बाळूर), विठ्ठलराव बागडे, भगवान खोंडे (सावळी), डॉ. संजय मुळे (डोंगाव), सुशीलकुमार जाधव (चांदोरी), दिनेश मुधळे (भालकी), प्रा. डी. डी. शिंदे-पाटील आदींनी आपली मते मांडली.

बैठकीत मराठी माध्यमाच्या शाळांसाठी शिक्षकांची पदे मंजूर करण्याची मागणी तसेच शासकीय आणि अशासकीय कार्यालयांच्या फलकांवर मराठी भाषेत नावे लावण्याबाबतचे ठराव एकमताने मंजूर करण्यात आले. या मागण्यांसाठी पुढील काळात करण्यात येणारी आंदोलने, मोर्चे तसेच प्रशासकीय पातळीवरील पाठपुरावा याबाबतची दिशा निश्चित करण्याचेही ठरविण्यात आले.

बैठकीच्या शेवटी प्रा. डी. डी. शिंदे-पाटील (तोरणेकर) यांनी आभार मानले. अध्यक्षांच्या परवानगीने बैठक समाप्त करण्यात आली.

About Belgaum Varta

Check Also

ऑक्टोबरपासून फ्लायओव्हरच्या कामाला मुहूर्त; वाहतूक कोंडीला मिळणार ‘ब्रेक’!

Spread the love  निविदा प्रक्रिया पूर्ण; काम सुरू करण्यासाठी प्रशासनाची जय्यत तयारी – प्रमुख मार्गांवरील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *