बेळगाव : मतदार यादीतील नवीन मतदारांची नोंदणी, मृत व स्थलांतरित मतदारांची नावे वगळणे तसेच आवश्यक दुरुस्त्यांसह विशेष संक्षिप्त पुनरीक्षणाचे काम शंभर टक्के पूर्ण करण्यासाठी बीएलओंनी घरोघरी जाऊन पडताळणी करावी, असे निर्देश कर्नाटकचे मुख्य निवडणूक अधिकारी वाय. अन्बुकुमार यांनी दिले. बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण आढावा …
Read More »येळ्ळूर बायपासवर चिखलाचे साम्राज्य; २५ ते ४० दुचाकी घसरल्या, अनेक जखमी
बेळगाव : हलगा-मच्छे बायपासच्या सुरू असलेल्या कामामुळे येळ्ळूर रस्ता बायपास परिसरात रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल साचल्याने रविवारी भीषण अपघातांची मालिका घडली. निसरड्या झालेल्या रस्त्यावर सुमारे २५ ते ४० दुचाकी वाहने घसरून पडली, तर अनेक नागरिक जखमी झाले. मिळालेल्या माहितीनुसार, हलगा-मच्छे बायपास प्रकल्पाची वाहने येळ्ळूर रस्ता आणि गावातून ये-जा …
Read More »पाच वर्षांनंतर पुन्हा ई-केवायसी; बेळगाव जिल्ह्यात 22.44 लाख रेशनकार्डधारकांची पडताळणी
बेळगाव : अपात्र बीपीएल रेशनकार्डधारकांचा शोध घेण्यासाठी अन्न व नागरी पुरवठा विभागाने पुन्हा एकदा ई-केवायसी (e-KYC) मोहीम सुरू केली आहे. पाच वर्षांपूर्वी ई-केवायसी केलेल्या लाभार्थ्यांची नव्याने पडताळणी करण्याचे आदेश अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या आयुक्तांनी राज्यातील सर्व उपसंचालकांना दिले आहेत. त्यानुसार बेळगाव जिल्ह्यातील 22 लाख 44 हजार 860 रेशनकार्डधारकांची …
Read More »रिमझिम सरींच्या भरवशावर भात रोपलागवड; पावसाच्या लपंडावात बळीराजाची जीवाची कसरत
बेळगाव : मान्सूनच्या लहरीपणामुळे संकटात सापडलेल्या बळीराजाला गेल्या तीन-चार दिवसांपासून सुरू असलेल्या रिमझिम पावसाने दिलास्याचा हात दिला आहे. कडक उन्हामुळे करपण्याच्या मार्गावर असलेल्या पिकांना या सरींनी नवसंजीवनी मिळाली असली, तरीही पुरेसा पाऊस नसल्याने शेतकरी अजूनही चिंतेत आहेत. पावसाच्या भरवशावर आणि वेळ हातातून निसटू नये म्हणून शेतकरी जीवाची कसरत करत …
Read More »शिक्षक भरतीच्या मसुदा नियमांना म. ए. युवा समिती सीमाभागचा विरोध; मराठी उमेदवारांसाठी सुधारणा करण्याची मागणी
बेळगाव : कर्नाटक शासनाच्या शालेय शिक्षण व साक्षरता विभागाने १४ जुलै २०२६ रोजी प्रसिद्ध केलेल्या GPSTR, PSTR आणि HSTR शिक्षक भरतीच्या कॅडर अँड रिक्रूटमेंट (C&R) मसुदा नियमांवर महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागने आक्षेप घेतला आहे. या संदर्भात समितीने शालेय शिक्षण व साक्षरता विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांना निवेदन सादर करून …
Read More »सावंतवाडी–चंदगड रेल्वे मार्गासाठी पुन्हा आवाज; ५० वर्षांनंतरही प्रकल्प रखडलेलाच
बेळगाव : सावंतवाडी–चंदगड तसेच महाराष्ट्रातील सीमाभागातील गावांना रेल्वेने जोडण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे. १९७० साली या मार्गासाठी सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यानंतर २०१८ मध्येही नव्याने सर्वेक्षण झाले, मात्र अद्याप या भागातील नागरिकांना रेल्वे सेवेसाठी प्रतीक्षाच करावी लागत आहे. समता सहकारी सामाजिक संस्थेचे अध्यक्ष आणि कोल्हापूर जिल्हा …
Read More »SIR फॉर्म मराठीत देण्याचे निर्देश; भागोजीराव पाटील, मोतेश बारदेशकर यांच्या पाठपुराव्याला यश
बेळगाव : सीमाभागातील मराठी भाषिक मतदारांना विशेष पुनरीक्षण (SIR) प्रक्रियेतील अर्ज व आवश्यक कागदपत्रे मराठी भाषेत उपलब्ध करून देण्याच्या मागणीला यश आले आहे. यासाठी बेळगावचे सामाजिक कार्यकर्ते भागोजीराव पाटील आणि मोतेश बारदेशकर यांनी दिल्ली येथे जाऊन भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांची प्रत्यक्ष भेट घेत निवेदन सादर केले. १६ जुलै रोजी …
Read More »सोनम वांगचुकांच्या समर्थनार्थ बेळगावात भव्य मोर्चा; शिक्षण सुधारणांची जोरदार मागणी
बेळगाव : शिक्षण व्यवस्थेत पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि सर्वंकष सुधारणांच्या मागण्यांसाठी दिल्लीत आंदोलन करणारे शास्त्रज्ञ व शिक्षणतज्ज्ञ सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ सोमवारी बेळगावात विविध सामाजिक, विद्यार्थी आणि नागरिक संघटनांच्या वतीने भव्य निषेध मोर्चा काढण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानापासून सुरू झालेला मोर्चा चन्नम्मा सर्कलमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आला. आंदोलकांनी घोषणाबाजी …
Read More »युनियन जिमखाना गोळीबार प्रकरणाचे धागेदोरे पुण्यापर्यंत; पिस्तूलाच्या स्रोताचा शोध
बेळगाव : युनियन जिमखाना येथील रमी क्लबमध्ये मंगळवारी रात्री झालेल्या गोळीबार प्रकरणाचा तपास आता पुण्यापर्यंत पोहोचल्याचे समोर आले आहे. गोळीबारासाठी वापरण्यात आलेले पिस्तूल नेमके कोठून आणण्यात आले, याचा शोध बेळगाव शहर पोलीस घेत असून या प्रकरणातील अनेक धागेदोरे पुण्याशी जोडले गेल्याची प्राथमिक माहिती आहे. या प्रकरणात पोलिसांनी गोळीबारानंतर संशयित …
Read More »जिमखाना क्लब गोळीबार प्रकरण : आरोपींना मदत करणारा कारचालक अटकेत
बेळगाव : शहरातील कॅम्प परिसरातील जिमखाना रम्मी क्लबमध्ये रौडीशीटर सुरेश जालगार याच्यावर झालेल्या गोळीबार प्रकरणात पोलिसांनी महत्त्वाची कारवाई करत आरोपींना घटनास्थळी आणणाऱ्या कारचालकाला अटक केली आहे. गोळीबार करणाऱ्या आरोपींना मदत केल्याच्या आरोपावरून पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यानंतर वैद्यकीय तपासणीसाठी त्याला बेळगाव येथील बीम्स रुग्णालयात नेण्यात आले. पुढे …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta