Sunday , September 20 2026
Breaking News

‘जय गणेश श्री-२०२६’ शरीरसौष्ठव स्पर्धेची घोषणा

Spread the love

 

विजेत्याला एसएसएस फौंडेशनकडून २५ हजारांचे पारितोषिक; चेतन ताशिलदार यांच्याकडून सायकल

बेळगाव : बेळगाव डिस्ट्रिक्ट बॉडी बिल्डर असोसिएशन अँड स्पोर्ट्सची वार्षिक सभा क्लब रोड येथील डॉ. संजय अण्णा सुंठकर यांच्या कार्यालयात उत्साहात पार पडली. या सभेत आगामी ‘जय गणेश श्री-२०२६’ या शरीरसौष्ठव स्पर्धेची घोषणा करण्यात आली.

‘जय गणेश श्री-२०२६’ किताब पटकाविणाऱ्या विजेत्यास एसएसएस फौंडेशनतर्फे २५ हजार रुपयांचे रोख पारितोषिक देण्याची घोषणा करण्यात आली. तसेच चेतन ताशिलदार यांच्यातर्फे किताब विजेत्याला सायकल देण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले.

यावेळी श्री. मल्लेश अण्णा चौगुले यांनी नोव्हेंबर-डिसेंबरदरम्यान जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धा ‘जय भीम क्लासिक ट्रॉफी’ आयोजित करण्याचे आश्वासन दिले.

सभेत संघटनेचा जमा-खर्चाचा अहवाल सादर करून त्यास उपस्थित सदस्यांनी मंजुरी दिली. तसेच वर्षभरातील संघटनेच्या कामकाजाचा आढावा अनिल अंबारोळे यांनी सादर केला.

या वार्षिक सभेला मल्लेश चौगुले, विकास कलघटगी, डॉ. संजय अण्णा सुंठकर, महेश सातपुते, अनिल अंबरोळे, राजेश लोहार, रणजित किल्लेकर, नारायण चौगुले, चेतन ताशिलदार, विजय चौगुले, श्रीधर बारटक्के, भारत बाळेकुंद्री, सुनील बोकडे, बाबू पावशे, दीपक हलगेकर, प्रवीण कणबरकर यांच्यासह अनेक व्यायामपटू उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *