
बेळगाव : कॅम्प येथील शाळेच्या मैदानावर कॅन्टोन्मेंट शाळेच्या वतीने आयोजित शहर व तालुकास्तरीय प्राथमिक व माध्यमिक मुला-मुलींच्या हँडबॉल स्पर्धेत बालिका आदर्श शाळेने दुहेरी मुकुट पटकावला. संत मीरा आणि सेंट झेवियर्स शाळांनीही आपापल्या गटात विजेतेपद मिळविले.
प्राथमिक मुलांच्या गटातील अंतिम सामन्यात सेंट झेवियर्स शाळेने संत मीरा शाळेचा ३-१ असा पराभव केला. मुलींच्या गटात बालिका आदर्श शाळेने सेंट झेवियर्सचा ४-१ असा पराभव करून विजेतेपद मिळविले.
माध्यमिक मुलांच्या गटातील अंतिम सामन्यात संत मीरा शाळेने सेंट झेवियर्सचा ६-४ असा पराभव केला. तर मुलींच्या गटात बालिका आदर्श शाळेने सेंट झेवियर्सचा ८-० असा दणदणीत पराभव करत विजेतेपद पटकावले.

स्पर्धेच्या उद्घाटन व बक्षीस वितरण समारंभाला बेळगाव कॅन्टोन्मेंटचे सीईओ सुदाम मंचलवार, कॅन्टोन्मेंट शाळेच्या मुख्याध्यापिका निशा गावडे, परशुराम बिरजे, राजू कदम, शामलाल धनवर, शहराचे पीईओ जाहिदा पटेल, हणमंत मास्तीहोळी, एच. व्ही. रोगी, मार्गेरेट डिसोझा, प्रकाश बजंत्री, चंद्रकांत पाटील, जयसिंग धनाजी, उमेश मजुकर, उमेश बेळगुदकर, येस्ताराणी, ज्युलेट फर्नांडिस आदी उपस्थित होते.
या स्पर्धेतील विजेते संघ आगामी जिल्हास्तरीय हँडबॉल स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत.

Belgaum Varta Belgaum Varta