
विद्यार्थी, महिला व पुरुष गटातील भजनी मंडळांचा सहभाग; विजेत्यांचा गौरव
खानापूर : लोकमान्य एज्युकेशन सोसायटी संचालित रावसाहेब वागळे पदवीपूर्व महाविद्यालय आणि श्री चौराशीदेवी संगीत कला मंच यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘श्री विठ्ठल नाद’ संगीत भजन स्पर्धा उत्साहात पार पडली. विद्यार्थी, महिला आणि पुरुष अशा तीन गटांत झालेल्या या स्पर्धेत विविध भजनी मंडळांनी सहभाग घेतला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोकमान्य एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी सत्यवर्त नाईक होते. खानापूरचे आमदार विठ्ठल सोमाण्णा हलगेकर यांच्या उपस्थितीत स्पर्धेचे उद्घाटन झाले. आमदार अरविंद चंद्रकांत पाटील, गर्लगुंजी ग्रामपंचायत सदस्य प्रसाद विठ्ठलराव पाटील, महाविद्यालयाच्या प्राचार्या शरयू वसंतराव कदम, शिवस्वराज्य जनकल्याण फाउंडेशनचे अध्यक्ष निरंजन उदयसिंग सरदेसाई, संस्थापक अध्यक्ष विलास कृ. बेळगावकर, माजी ता.पं. सदस्य बाळाराम महादेव शेलार आणि वकील संघटनेचे अध्यक्ष आय. आर. घाडी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले.
विद्यार्थी गटात जांबोटी माध्यमिक विद्यालयाने प्रथम क्रमांक मिळविला. श्री चौराशी हार्मोनियम मंडळ खानापूर द्वितीय, मराठा मंडळ हायस्कूल करंबळ तृतीय, मराठा मंडळ हायस्कूल खानापूर चौथा, तर लोकमान्य वागळे महाविद्यालय खानापूरने पाचवा क्रमांक मिळविला. विजेत्यांना रोख रक्कम, मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.
महिला गटात श्री विठ्ठल रखुमाई महिला भजन मंडळ मणतुर्गेने प्रथम क्रमांक पटकाविला. हनुमान महिला भजन मंडळ मोदेकोप द्वितीय, दत्त महिला भजन मंडळ ओलमनी तृतीय, नागेशदेव महिला भजन मंडळ नागुर्डा चौथा, महिला भजन मंडळ विद्यानगर खानापूर पाचवा, माऊली भजन मंडळ मोदेकोप सहावा आणि महिला भजन मंडळ दादोबा नगर खानापूरने सातवा क्रमांक मिळविला. रवळनाथ महिला भजन मंडळ खानापूर, चौराशीदेवी महिला भजन मंडळ खानापूर, तसेच कौदल, किरावळे व माणीकवाडी येथील मंडळांना उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात आली.
पुरुष गटात श्री शिवगणेश भजन मंडळ दारोळीने बाजी मारत प्रथम क्रमांक मिळविला. श्रीराम भजन मंडळ जांबोटी पेठ द्वितीय, दुर्गा भजन मंडळ बैलूर तृतीय, श्री बालशिवाजी संगीत भजन मंडळ मणतुर्गे चौथा, श्री विठ्ठल रखुमाई भजन मंडळ कुपटगिरी पाचवा, स्वयंभू श्री माऊली भजन मंडळ हब्बनहट्टी सहावा आणि श्री माऊली भजन मंडळ जांबोटीने सातवा क्रमांक मिळविला.
महिला गटातील बक्षीस वितरण आमदार विठ्ठल सोमाण्णा हलगेकर, आबासाहेब दळवी, बाळाराम म. शेलार, भरमाणी पाटील, भरत तोपीनकट्टी, मलेशी आदींच्या हस्ते झाले. पुरुष गटातील विजेत्यांना आबासाहेब दळवी, पत्रकार वासुदेव चौगुले, निवृत्त बीएसएनएल अधिकारी एम. टी. कुंभार, प्रल्हाद गुंडपीकर, महिपती गं. बेळगावकर आणि रामचंद्र पाटील यांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली.
स्पर्धेचे परीक्षण धर्माजी नंद्रणकर आणि ह.भ.प. शशिकांत गावडे यांनी केले. प्रास्ताविक एम. व्ही. चोर्लेकर यांनी केले, तर सूत्रसंचालन प्रा. शंकर गावडा यांनी केले.

Belgaum Varta Belgaum Varta