Monday , April 20 2026
Breaking News

बेळगाव

ए. व्ही. कराटे ॲकॅडमीच्या सृष्टी जाधवची राष्ट्रीय स्तरावर सुवर्ण कामगिरी

  बेळगाव व गोव्यातील काता – कुमिते स्पर्धांमध्ये उज्ज्वल यश बेळगाव : ए.व्ही. कराटे ॲकॅडमीची उदयोन्मुख खेळाडू व समाजसेविका सौ. माधुरी जाधव (पाटील) यांची कन्या कु. सृष्टी स्वप्नील जाधव हिने राष्ट्रीय व आंतरराज्यीय कराटे स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करत बेळगावचे नाव उज्ज्वल केले आहे. दि. २१ डिसेंबर रोजी बेळगाव येथे आयोजित …

Read More »

इलेक्ट्रॉनिक वस्तू चोरी प्रकरणी एकास अटक; 4.49 लाखांचा मुद्देमाल जप्त

  बेळगाव : माळमारुती पोलीस ठाण्याच्या हद्दीत ॲमेझॉनसह विविध कंपन्यांच्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंची चोरी करणाऱ्या एका आरोपीस पोलिसांनी अटक केली आहे. ॲमेझॉन कंपनीचा अधिकृत वितरक म्हणून काम करणारा प्रवीण पद्मराज तडसद (वय 29, रा. जमखंडी, जि. बागलकोट) याने 14 जून 2025 ते 2 ऑगस्ट 2025 या कालावधीत बेळगाव ऑटो नगर परिसरातून …

Read More »

महाराष्ट्र एकीकरण युवा समितीतर्फे आयोजित ‘सामान्यज्ञान स्पर्धा–२०२६’ विद्यार्थ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद

  बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समिती बेळगावच्या वतीने आज मंगळावर दिनांक ६ जानेवारी रोजी मराठा मंदिर आणि तुकाराम महाराज सांस्कृतिक भवन येथे भव्य सामान्यज्ञान स्पर्धा अभूतपूर्व उत्साहात संपन्न झाल्या. या स्पर्धेला ३००० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. स्पर्धेचे उद्घाटन मराठा मंदिर येथे मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले. श्री. रमेश पावले यांच्या …

Read More »

मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सर्व सभासदांची बैठक गुरुवारी

  बेळगाव : मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सर्व सभासदांची बैठक गुरुवार दिनांक 8 जानेवारी 2026 रोजी दुपारी 3-30 वाजता मराठा मंदिर खानापूर रोड बेळगाव येथे बोलावण्यात आली आहे. या बैठकीत 17 जानेवारी हुतात्मा दिन संदर्भात चर्चा होणार आहे. मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सर्व सभासदांनी वेळेवर उपस्थित रहावे, असे आवाहन मध्यवर्ती …

Read More »

पत्रकार समाजाला योग्य दिशा देण्याचे कार्य करतात : माजी आम. परशुरामभाऊ नंदिहळ्ळी यांचे प्रतिपादन

  बेळगाव : विविध प्रश्नांवर लेखणी द्वारे आवाज उठवणे,सामाजिक कार्याला योग्य न्याय आणि समाजाला योग्य दिशा देण्याचे कार्य पत्रकार अखंडितपणे करत असतात, असे प्रतिपादन माजी आमदार परशुरामभाऊ नंदिहळ्ळी यांनी बोलताना केले. दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त प्रत्येक वर्षी पत्रकार दिन साजरा केला जातो.बेळगावातही बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून …

Read More »

लोकशाहीचे रक्षण करण्याची जबाबदारी पत्रकारांची

  मराठी पत्रकार संघातर्फे पत्रकार दिन साजरा : बाळशास्त्री जांभेकर पुरस्काराचे वितरण बेळगाव : सत्तेसाठी राजकीय पक्ष कोणत्याही थराला जात असल्याने आज लोकशाहीला धोका निर्माण झाला आहे. तिचे संरक्षण करण्याची जबाबदारी पत्रकारांची आहे, असे प्रतिपादन बेळगांव जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष कृष्णा शहापूरकर यांनी केले. पत्रकार संघातर्फे मंगळवारी (६ जानेवारी) …

Read More »

काँग्रेसचे युवा नेते मृणाल हेब्बाळकर यांच्या चालकावर प्राणघातक हल्ला

  बेळगाव : महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांचे पुत्र काँग्रेसचे युवा नेते मृणाल हेब्बाळकर यांच्या कारचालकावर अज्ञात व्यक्तींनी चाकूहल्ला केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी बेळगावातील क्लब रोड परिसरात घडली आहे. या हल्ल्यात बसवंत कडोलकर (वय ३२) असे जखमी चालकाचे नाव असून, हल्ल्यानंतर त्यांना तातडीने एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात …

Read More »

रस्त्याकडेला असहाय्य जखमी पडलेल्या वृद्धाला सामाजिक कार्यकर्त्यांचा दिलासा

  बेळगाव : बेळगाव रेल्वे स्थानकाजवळ रस्त्याकडेला असहाय्य जखमी अवस्थेत झोपून असलेल्या एका वृद्ध इसमाला सामाजिक कार्यकर्त्यांनी आज मंगळवारी सकाळी माणुसकीच्या दृष्टिकोनातून हॉस्पिटलमध्ये दाखल करून दिलासा दिला. याबाबतची थोडक्यात माहिती अशी की, शहरातील सामाजिक कार्यकर्ते ॲलन विजय मोरे, अवधूत तुडवेकर व संतोष दरेकर यांना बेळगाव रेल्वे स्थानकाजवळ एक वृद्ध इसम …

Read More »

जोशीज पब्लिक सेंट्रल स्कूलचे स्नेहसंमेलन साजरे

  बेळगाव : मंडोळी रोड येथील जोशीज पब्लिक सेंट्रल स्कूल मध्ये वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरे झाले. यामध्ये विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेऊन विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. माधव प्रभू उपस्थित होते. दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर डॉ. माधव प्रभू यांचा सत्कार करण्यात आला. …

Read More »

येळ्ळूर विभाग म. ए. समितीची महत्वाची बैठक उद्या

    बेळगाव : येळ्ळूर विभाग म. ए. समितीची महत्वाची बैठक बुधवार दि. 07/01/2026, रोजी सायंकाळी ठीक 7.00 वाजता येळ्ळूर विभाग म. ए. समितीच्या कार्यालयात बालशिवाजी वाचनालाय येथे होणार आहे. तरी या बैठकीला आजी -माजी लोकप्रतिनिधी, जिल्हा पंचायत, तालुका पंचायत, ग्राम पंचायत, तसेच नेते व सर्व पदाधिकारी, युवा यांनी जास्तीत …

Read More »