Tuesday , September 1 2026
Breaking News

रोटरॅक्ट क्लब ऑफ वेणुग्राम-बेळगावचा ‘माती ते मोरया’ उपक्रम उत्साहात

Spread the love

 

बेळगाव : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रोटरॅक्ट क्लब ऑफ वेणुग्राम-बेळगावच्या ‘विद्योदय’ उपक्रमांतर्गत अनगोळ येथील शासकीय मराठी उच्च प्राथमिक शाळा क्र. 34 येथे शनिवारी ‘माती ते मोरया’ या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती निर्मिती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.

कार्यशाळेच्या सुरुवातीला विद्यार्थ्यांना पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचे महत्त्व, शाडू मातीच्या मूर्तीचे फायदे तसेच प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीमुळे होणारे पर्यावरणीय दुष्परिणाम याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. गणेशोत्सव साजरा करताना पर्यावरणाचे संरक्षण करण्याची जबाबदारी प्रत्येकाची असल्याचे विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आले.

यानंतर विद्यार्थ्यांसाठी प्रत्यक्ष क्ले गणेशमूर्ती निर्मिती कार्यशाळा घेण्यात आली. विद्यार्थ्यांना माती मळण्यापासून गणेशमूर्तीचा आकार तयार करणे, सोंड, कान, मुकुट व इतर बारकावे साकारण्यापर्यंतची प्रक्रिया प्रात्यक्षिकासह शिकवण्यात आली. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत आपल्या कल्पकतेतून स्वतःच्या हातांनी गणरायाच्या सुंदर मूर्ती साकारल्या.

‘माती ते मोरया’ या उपक्रमातून विद्यार्थ्यांना कलात्मक अभिव्यक्तीची संधी मिळण्यासोबतच पर्यावरण संवर्धनाचा संदेश आणि शाश्वत गणेशोत्सवाची जाणीव निर्माण झाली.

कार्यशाळेचे आयोजन व मार्गदर्शन ओंकार मनवाडकर यांनी केले. यावेळी विद्योदय उपक्रमाचे अध्यक्ष अनिकेत जाधव, श्रीधर कुलकर्णी, सिद्धांत भोसगी, मधुसूदन देसाई, समीक्षा पाटील आणि प्रेमा मिरजकर यांची उपस्थिती होती. शाळेतील शिक्षकांनीही उपक्रमासाठी सहकार्य केले.

About Belgaum Varta

Check Also

दारू पिऊन गोंधळ घालणाऱ्या आरोपीला ५० रोपे लावण्याची शिक्षा

Spread the love चिकोडी : दारूच्या नशेत गोंधळ घातल्याप्रकरणी चिकोडी जेएमएफसी न्यायालयाने आरोपीला अनोखी शिक्षा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *