Tuesday , September 1 2026
Breaking News

दारू पिऊन गोंधळ घालणाऱ्या आरोपीला ५० रोपे लावण्याची शिक्षा

Spread the love

चिकोडी : दारूच्या नशेत गोंधळ घातल्याप्रकरणी चिकोडी जेएमएफसी न्यायालयाने आरोपीला अनोखी शिक्षा सुनावली आहे. यक्षंबा शहरातील अनिल निंगाप्पा पुजारी याने स्वतःहून आपली चूक मान्य केल्याने न्यायालयाने त्याला ५० रोपे लावण्याचे आदेश दिले.

न्यायालयाच्या आदेशानुसार चिकोडी न्यायालयाच्या आवारात २५ तर सदलगा पोलीस ठाण्याच्या आवारात २५ अशी एकूण ५० रोपे लावण्याचे निर्देश देण्यात आले. त्यानुसार अनिल पुजारी याने पत्नीसमवेत दोन्ही ठिकाणी ५० रोपांची लागवड केली.

सामान्यतः गुन्ह्यासाठी दंड किंवा कारावासाची शिक्षा दिली जाते. मात्र, चिकोडी न्यायालयाने पर्यावरण संवर्धनाला प्रोत्साहन देणारी शिक्षा देत सामाजिकदृष्ट्या सकारात्मक संदेश दिला आहे.

‘चुकीला शिक्षा, पर्यावरणाला योगदान’ असा संदेश देणारा हा निर्णय परिसरात चर्चेचा विषय ठरला आहे. आरोपीने केलेल्या चुकीची जाणीव करून देतानाच पर्यावरणाच्या संवर्धनासाठी त्याच्याकडून प्रत्यक्ष योगदान करून घेण्याच्या न्यायालयाच्या भूमिकेचे कौतुक होत आहे.

About Belgaum Varta

Check Also

“बेळगाव कर्नाटकाचा अविभाज्य भाग” ठराव करण्याचा सरकारचा महापालिकेला आदेश!

Spread the love  उद्या पत्रकार परिषदेत होणार खुलासा बेळगाव : बेळगाव महानगरपालिकेत कर्नाटकाच्या समर्थनार्थ ठराव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *