
निपाणी (वार्ता) : जैन समाजासाठी स्वतंत्र विकास महामंडळ स्थापन करावे, ही समाजाची अनेक वर्षांची मागणी आहे. या पार्श्वभूमीवर बेंगळुरू येथे जैन समाजाचे भट्टारक स्वामीजी आणि प्रमुख नेत्यांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांची भेट घेऊन या बाबत निवेदन देऊन चर्चा केली. या प्रसंगी राष्ट्रसंत आचार्य श्री १०८ गुणधरनंदी महाराज यांच्या आगामी जन्म समारंभास आग्रहाचे निमंत्रण मुख्यमंत्री शिवकुमार यांना देण्यात आले. या भेटी दरम्यान जैन समाजाच्या विविध मागण्या आणि सर्वांगीण विकासाबाबत मुख्यमंत्र्यांना माहिती देण्यात आली.
निवेदनातील माहिती अशी, जैन विकास महामंडळाची स्थापना करणे, तसेच समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक प्रगतीसाठी आवश्यक असणाऱ्या विविध योजनांवर मुख्यमंत्र्यांनी लक्ष दिल्यास समाजाचा विकास होणार आहे. सहकाररत्न उत्तम पाटील यांनी, जैन समुदायाच्या विकासासाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्याची मागणी आहे.
बैठकीस भानुकीर्ती भट्टाचार्य महास्वामी (कंबदलहल्ली), पंडिताचार्य चारुकीर्ती भट्टाचार्य स्वामी (मूडबिद्री), धर्मसेन भट्टाचार्य स्वामी (वरूर), लक्ष्मीसेन भट्टाचार्य स्वामी (कोल्हापूर-रायबाग), माजी मंत्री वीरकुमार पाटील, सुनील हनमन्नवार, धुळगौडा पाटील, डॉ. एन. ए. मगदूम यांच्यासह जैन समाजातील नागरिक उपस्थित होते.

Belgaum Varta Belgaum Varta